घरमनोरंजनअगेन बंटी और बबलीचा सिक्वेल येणार

अगेन बंटी और बबलीचा सिक्वेल येणार

Subscribe

अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी या जोडीनं बरीच धमाल उडवून दिली होती. हीच जोडी आता पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा बॉलिवूडविश्वात सुरू

राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या २००५ मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते. त्यामधील गाण्याची विशेषतः ऐश्‍वर्या रायवर चित्रीत झालेल्या ‘कजरा रे’ गाण्याची क्रेझ अजूनही कायम आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी या जोडीनं बरीच धमाल उडवून दिली होती. हीच जोडी आता पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा बॉलिवूडविश्वात सुरू झाली आहे.

 

View this post on Instagram

 

#Hichki #promotions

A post shared by Rani Mukerji Chopra (@ranimukerji_official) on

- Advertisement -

या चित्रपटाच्या सिक्वेलचे ‘बंटी और बबली अगेन’ असे नाव असणार आहे. या चित्रपटाची शुटिंग मुंबईमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

यामध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी अतिशय मजेदार चोरट्याची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिका नेहमीच चाहत्यांच्या लक्षात राहिल्या. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अशीही चर्चा सुरू आहे की, या चित्रपटाचा दिग्दर्शक शाद अली हा बंटी और बबलीचा सिक्वेल लवकरच घेऊन येणार आहे.

 

View this post on Instagram

 

❤️ ?: @aishwaryaraibachchan_arb

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

- Advertisement -

बंटी और बबली अगेन मध्ये अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. पण या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांची भूमिका कशी असेल याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -