घरताज्या घडामोडीअक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटाचे नाव आता 'सम्राट पृथ्वीराज'

अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे नाव आता ‘सम्राट पृथ्वीराज’

Subscribe

rajputana, prithviraj, movie of prithviraj, prithviraj, prithvi raj issue, prithviraj interview,पृथ्वीराज सिनेमाचं नाव बदललं, पृथ्वीराज सिनेमा आता सम्राट पृथ्वीराज, अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, यशराज फिल्म

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी ‘पृथ्वीराज’ (prithviraj) चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. करणी सेनेने केलेल्या मागणीनंतर ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय कुमारचा हा सिनेमा नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. करणी सेनेने चित्रपटाच्या नावाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवस शिल्लक राहिले असतानाच चित्रपटाच्या नावात बदल केला आहे.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्री राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांना पत्र लिहून चित्रपटाच्या नावात अपेक्षित बदल करण्यात येत असल्याचे कळवले. त्यानुसार, ‘पृथ्वीराज’ चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ या नावानं प्रदर्शित होणार आहे. 3 जूनला हा चित्रपच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

चित्रपटाच्या नावाविरोधात कोर्टात धाव

दरम्यान, श्री राजपूत करणी सेनेनं या चित्रपटाच्या नावाविरोधात कोर्टात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. त्याशिवाय, याबाबत अनेक बैठका झाल्या होत्या. त्याचप्रमाणे नोटीशाही पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अखेर पृथ्वीराज चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म्सने राजपूत समाजाच्या भावाना आणि मागणीचा विचार करता चित्रपटाचं नाव त्यांनी ‘पृथ्वीराज’ वरुन ‘सम्राट पृथ्वीराज’ असा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, करणी सेनेला एक पत्र लिहून याची माहिती दिली.

करणी सेनेला दिलेल्या पत्रात काय लिहीले?

“यशराज फिल्म्स भारतीय सिनेमा क्षेत्रात मागील ५० वर्षांपासून काम करत आहे. यशराज फिल्म्सने भारतीय सिनेमाच्या इतिहासात अनेक सर्वोत्तम सिनेमे दिलेत. आम्ही रसिकांचे मनोरंजन करत आहोत आणि करत राहू. आमच्या सिनेमाच्या सध्याच्या नावाबाबत तुमची जी तक्रार होती, त्याची आम्ही दखल घेतली आहे. यावर आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, आम्ही कोणाच्याही भावना दुखावतील किंवा शूर योद्धा पृथ्वीराज चौहान यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊ. उलट आम्ही त्यांच्या शौर्याचे, कामगिरीचे आणि देशाच्या इतिहासात दिलेले योगदान याचा आदर करतो.”

- Advertisement -

“यासंदर्भात आपल्यामध्ये अनेकदा झालेल्या चर्चांनंतर शांततेत आम्ही तुमच्या तक्रारीचे निवारण करत आहोत. आम्ही चित्रपटाचं नाव बदलून ते ‘सम्राट पृथ्वीराज’ असं करू. आम्ही श्री राजपूत करणी सेना आणि त्यांच्या सदस्यांचं आभार मानतो की, तुम्ही आमच्या चित्रपटासंबंधीच्या भावना समजून घेतल्या”, असं यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षये विधानी यांनी करणी सेनेला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.


हेही वाचा – ‘Bhool Bhulaiya 2’ च्या घवघवीत यशानंतर निर्माते बनवणार ‘Kabir Singh’ चा दुसरा सिक्वेल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -