Monday, May 3, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अभिनेता तथा सेवानिवृत्त लष्करी अधिकारी बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

अभिनेता तथा सेवानिवृत्त लष्करी अधिकारी बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

दिग्गज अभिनेत्याच्या अचानक आणि अकाली निधनाबद्दल अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी मित्रांनी शोक व्यक्त केला.

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनामुळे सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. प्रख्यात टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेते बिक्रमजित कंवरपाल (५२) यांचे शुक्रवारी कोरोनाने निधन झाले आहे. बिक्रमजीत यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे, तसेच ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. दिग्गज अभिनेत्याच्या अचानक आणि अकाली निधनाबद्दल अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी मित्रांनी शोक व्यक्त केला. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी बिक्रमजीत यांज्या निधनाची माहिती सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे. ”कोरोनामुळे अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाल्येचे ऐकून दु:ख झाले. माजी सैन्य अधिकारी बिक्रमजीत यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.” असे लिहित त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

भारतीय सेवानिवृत्त झाल्यानंतर बिक्रमजीत यांनी २००३ साली आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. विक्रमजीत यांनी आपल्या दीर्घ कारकीर्दीत ‘पेज ३’, ‘रॉकेट सिंग: सेल्समॅन ऑफ द ईअर ’, ‘आरक्षण’, ‘मर्डर २’, ‘२ स्टेट्स’ आणि ‘द गाजी अटॅक’ असे अनेकचित्रपट तसेच ‘दीया और बाती हम’, ‘ये हैं चाहतें, दिल ही तो है ’आणि ‘२४’ अशा मालिकांमध्येही काम केले आहे.


हे वाचा-  कपूर परिवारावर आणखी एक संकट, जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

- Advertisement -