Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अभिनेता अतुल कुलकर्णींचा नवा क्राइम शो प्रेक्षकांच्या भेटीस

अभिनेता अतुल कुलकर्णींचा नवा क्राइम शो प्रेक्षकांच्या भेटीस

हा शो इशारा या नव्या मनोरंजन चॅनलवर प्रदर्शित होणार आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेता अतुल कुलकर्णीचा ‘फरार कब तक’ हा नवा शो येत आहे. हा शो क्राइम शो असून सत्य घटनांवर आधारित आहे. अतुल कुलकर्णी या शोला होस्ट करत आहेत. या शोमध्ये FIR झालेल्या केसबद्दल पोलिस आणि गुन्हेगाराचा दृष्टीकोन दाखवला जाणार आहे. अतुल कुलकर्णी यांना असा वेगळा दृष्टीकोन नेहमीच पसंत आहे,त्यामुळे त्यांनी हा शो करण्यासाठी होकार दिला आहे. हा शो इशारा या नव्या मनोरंजन चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. इशारा टीव्ही चॅनेल १ मार्च २०२१ पासून सुरू झाले. यावर अनेक विषयांवर आधारित मालिका असणार आहेत.अतुल कुलकर्णींच्या मते, इशारा या नव्या चॅनलची विचारधारा हा इतरांपेक्षा वेगळा आहे. तसेच यामध्ये जास्त ड्रामा नाही . तुम्ही एकदा हे इशारा हे चॅनल लावलात की टिव्हीसमोरून जागचे हलणार नाही, इतका चांगला कन्टेंट यामध्ये आहे. म्हणून मी या शोसाठी होकार दिला आहे.


इशारा चॅनल १ मार्च २०२१ मध्ये सुरु झाले. हे चॅनल चार मालिकांसह ऑनएअर गेले आहे. ज्यामध्ये पौराणिक शो,’पापनाशिनी गंगा’ रोमांटिक थ्रिलर ‘अग्नि-वायु’ आणि दोन ड्रामा शो ‘हमकदम’ आणि ‘जननी’ या शोंचा समावेश आहे. सुप्रिया पिळगावकर, गुरदीप कोहली, भूमिका गुरांग, शिवानी तोमर आणि आकृति शर्मा यांसह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

- Advertisement -

अतुल कुलकर्णी हा मराठी चित्रपट आणि नाटक तसेच, बॉलिवूडमधील अभिनेता आहे. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर ही व्यक्तिरेखेबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांची दाद मिळाली. गाझी अटॅक या चित्रपटात उत्तम भूमिका पार पाडली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – विधानभवनाबाहेर वीजबिल दरवाढीविरोधात भाजपची निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

- Advertisement -