घरमनोरंजन'Kirsh 4' मधून ह्रतिक रोशनचे दमदार पुनरागमन

‘Kirsh 4’ मधून ह्रतिक रोशनचे दमदार पुनरागमन

Subscribe

बॉलिवूडमध्ये आपल्या हटके डान्स, अभिनय, अँक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता ह्रतिक रोशन पुन्हा सुपर हिरोच्या भूमिकेतून दमदार पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. ह्रतिकच्या ‘क्रिश’ चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ह्रतिकने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून ह्रतिकने ‘क्रिश ४’ या चौथ्या सिनेमाची घोषणा केली आहे. ह्रतिकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘क्रिश’ या भूमिकेचा मास्क दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर ह्रतिकने ‘भूतकाळात जे झाले ते झाले, चला भविष्यात काय घडते ते पाहू या.. ‘क्रिश ४’ अशी कॅप्शन दिली आहे. तसंच ‘क्रिश’ला १५ वर्षं पूर्ण झाल्यानं सर्व प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

- Advertisement -

२००३ मध्ये ह्रतिकच्या या चित्रपटाचा पहिला भाग ‘कोई मिल गया’ या चित्रपटाने सुरु झाला. या पहिल्याच भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या भागातील पुढील स्टोरी २००६ मध्ये ‘क्रिश’ चित्रपटातून पाहायला मिळाली. त्यानंतर २०१३ मध्ये ‘क्रिश ३’ हा चित्रपट आला. या चित्रपटालाही चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आता ‘क्रिश ४’ बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२० मध्ये ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणांनी ‘क्रिश ४’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. मात्र त्यानंतर ह्रतिकनं ‘मोहेंजोदडो’, ‘काबील’, ‘सुपर ३०’ आणि ‘वॉर’ या चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर आता ‘क्रिश ४’ मधून ह्रतिक सुपर हिरोच्या मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये रोहित टाइम ट्रॅव्हल करणार आहे. क्रिश आणि एलियनची मैत्री पुन्हा प्रेक्षकांना पहायला मिळाणार आहे अशी चर्चा आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -