Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर, मुंबई घेताहेत उपचार

अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर, मुंबई घेताहेत उपचार

चंढीगढचे भाजपा प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी दिली माहिती

Related Story

- Advertisement -

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार किरण खेर (Kirron kher) यांना ब्लड कॅन्सर (Blood Cancer) झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चंदीगडचे भाजपा प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी ही माहिती दिली आहे.

किरण खेर या चंदीगडमध्ये भाजपच्या खासदार आहेत. दरम्यान ३१ मार्च रोजी चंदीगडमधील काँग्रेस नेत्यांनी खासदार किरण खेर यांच्या मतदार संघातील अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. याच प्रश्नावर उत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी किरण खेर यांच्या ब्लड कॅन्सर आजाराची माहिती दिली.

- Advertisement -

बुधवारी 31 मार्चला घेण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत बोलताना अरुण सूद म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात किरण खेर चंदीगडमध्ये होत्या. नोव्हेंबरमध्ये त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांवर चंदीगडमध्येच उपचार सुरु होते. मात्र यावेळी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये किरण खेर यांना मल्टिरल माइलोजा आजार असल्याचे समजले. यानंतर खेर पुढील उपचारांसाठी ४ डिसेंबर रोजी मुंबई रवाना झाल्या. या आजारावरील उपचारांसाठी त्यांना मुंबईत दर आठवड्याचा एक दिवस रुग्णालयात भर्ती करावे लागते. तसेच चेकअपसाठीही त्यांनी रुग्णालयात सतत ये-जा करावी लागत आहे. याच कारणामुळे पुढील काही दिवस त्या शहरात येऊ शकत नाहीत. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचंही सूद यांनी दिली.

किरण खेर (Kirron Kher) यांनी ‘मल्टीपल मायलोमा’ या आजाराने ग्रासले आहे. हा आजार रक्ताचा क्षयरोग आहे. सध्या किरण यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असले तरी त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.


- Advertisement -

 

- Advertisement -