घरताज्या घडामोडीअभिनेत्री केतकी चितळेची फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल

अभिनेत्री केतकी चितळेची फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल

Subscribe

अभिनेत्री केतकी चितळे याना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. केतकी नेहमीच आपल्या फेसबुक अकाऊंटवर अक्षेपार्ह पोस्ट, व्हीडिओ, फोटो शेअर करत असते. पुन्हा एखदा अशीच अक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात भांडूपच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्या या पोस्टवर काही आंबेडकर विचारवादी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -

केतकीने टाकलेल्या या पोस्टमुळे तीला नेटकऱ्यांनीही चांगलेच ट्रोल केले आहे. अभिनेत्री केतकी चितळेने काल (1 मार्च) रात्री फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती.

- Advertisement -

त्यात तीने लिहीले की, ‘नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, ब्राह्मण द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की ‘मुसलमान, क्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू’ असं ही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय.आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो’

View this post on Instagram

#kelfiegirlrants about how, Marriage and age are two different things. Just because you are a certain age doesn't mean you ought to marry and be forced in a relationship. Being unemployed and working are two different things. Just because you are not currently getting paid, doesn't mean you aren't working on something else. Working on your own self counts as well. A marriage doesn't determine whether one should have kids or not. It is entirely up to you whether you want to reproduce or adopt (and become a part of #VHEMt) even when you aren't married, or not have kids at all even if you are married. It is absolutely okay to not satisfy the so called "goals" set by the hypocritical society. #betrue to yourself. #kelfie #kelfiegirlhappy #itsokay

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen) on

फेसबुकवर तीला या पोस्टमुळे ट्रोल करण्यात आले आहे. नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात या वाक्यावर अनेकांनी अक्षेप घेतला आहे. या लिखाणावरुन त्यांचा नवबौद्ध समाजाबद्दल त्यांच्या मनातील द्वेष समोर येतो. आम्ही त्यांच्या या लिखाणाचा जाहीर निषेध करतो. तसेच त्यांच्यावर अट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकर विचारवादी नेत्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -