घरमनोरंजनवर्दी अंगात घातल्यावर स्फुरण चढतं - मुक्ता बर्वे

वर्दी अंगात घातल्यावर स्फुरण चढतं – मुक्ता बर्वे

Subscribe

अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या नवीन चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नेहमीच असते. तीचा एखादा नवीन चित्रपट येणार म्हटल्यावर तो वेगळ्या विषयावर असणार हे नक्की. मुक्ता एखादा चित्रपट स्विकारताना तो खूप विचारपूर्वक स्विकारते. २१ जूनला मुक्ताचा बंदिशाळा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. बंदिशाळाच्या निमित्ताने मुक्ताशी केलेली बातचीत.

  •  ‘बंदिशाळा’ चित्रपटातील भुमिकेबद्दल काय सांगशील?
    – सत्यघटनेवर आधारीत हा चित्रपट आहे. मी एका युनीफॉर्ममधील अधिकाऱ्याच्या भुमिकेत आहे. पहिल्यांदाच मी अशाप्रकारची भुमिका करत आहे. ही भुमिका करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. यात खूप अॅक्शन्स सीन आहेत. त्यामुळे हे एक वेगळे चॅलेंज माझ्यासमोर होते. पण अशा प्रकराचा सिनेमा जेव्हा आपल्या वाट्याला येतो तेव्हा कलाकार म्हणून खूप समाधान वाटतं.

  •  ‘बंदिशाळा’ चित्रपटाचा तुझा अनुभव कसा होता?
    संजय पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जोगवा,पांगिरा असे संजय पाटील यांच्या या चित्रपटांप्रमाणेच हा सामाजिक भान जपणारा चित्रपट आहे. ज्याप्रमाणे जोगवा चित्रपटातील भुमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जोगवा या चित्रपटामुळे माणूस म्हणून मी एक वेगळा विचार करू लागले. त्याचप्रामणे ही भुमिका माझ्यासाठी खूप खास आहे. या भुमिकेने अनेक नव्या गोष्टी मला शिकवल्या. खूप विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. आपण समाजाच्या कोणत्या भागावर काय विचार करतो. हे हा चित्रपट बघितल्यावर समजतं. बंदिशाळा हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच खूप काही शिकवेल हे नक्की.

  • पोलिसाची वर्दी अंगावर घातल्यावर मुक्तात काय बदल झाला?
    पोलिसाची वर्दी अंगात घातल्यावर एक प्रकारचं स्फुरण अंगात चढतं. याचा अनुभव मी अॅक्शन सिक्वेलला घेतला. लहानपणापासूनच आपल्याला या वर्दीची क्रेझ असते. हा युनीफॉर्मही एक जबाबदारी आहे. हे युमीफॉर्म अंगात घातल्यावर त्याची जाणीव झाली. कोणीही उठून हा युमीफॉर्म घालू शकत नाही. माझं नशीब चांगलं म्हणून खोटा-खोटा का होईना हा युनीफॉर्म मला घालायला मिळाला. तो युमीफॉर्म पेलणं ही जबाबदारी आहे. मारामारीच्या सीनला खूप थकले की लक्षात यायचं आपल्या अंगात युमीफॉर्म आहे आपल्याला थकून चालणार नाही.
- Advertisement -

  •  चित्रपटात अनेक अॅक्शन सीन आहेत, त्याची तयारी कशी केलीस?
    चित्रपटाच्या फाईट मास्तरने माझ्याकडून खूप चांगल्याप्रकारे हे सीन करून घेतले. खरी मारामारी आणि स्क्रिनवरची मारामारी यात खूप फरक आहे. मला ते कायम सांगायचे तू खूप जोर लावू नकोस फक्त मला इफेक्ट दे. हे खूप शिकण्यासारखं होतं. समोरच्याला मारायचं नाहीये तर तसा केवळ अभिनय करायचा आहे. हे नवीन तंत्र मी या निमित्ताने शिकले.

  •  रूद्रम नंतर प्रेक्षक तुझी छोट्या पडद्यावर वाट बघत आहेत.
    मालिकांमध्ये काम करायला मी उत्सुक आहे. मी फार काम मालिकांमध्ये केलेले नाहीये. पण काही मोजक्या आणि उत्तम मालिका केल्या आहेत. पण लवकरच मी एखाद्या वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर येईन हे नक्की.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -