घरमहाराष्ट्रतरूणांच्या श्रमदानामुळे भागणार आदिवासी बांधवांची तहान

तरूणांच्या श्रमदानामुळे भागणार आदिवासी बांधवांची तहान

Subscribe

बदलापूर पासून हाकेच्या अंतरावर असलेला कवट्याची वाडी हा आदिवासी पाडा मात्र सामान्य मुलभूत सुविधांपासून अगदी आजही दूर आहे. एवढेच काय तर साध्या हंडाभर पाण्यासाठी येथील नागरिकांना दररोज अर्धा ते एक किलोमीटरची पायपीट करावी लागते आहे.

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या युथ आँफ टुडे फौंडेशनच्या वतीने येथून जवळच असलेल्या कवट्याची वाडी या आदिवासी पाड्यावर नुकताच श्रमदानातून पर्यावरण पूरक वनराई बंधारा बांधण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे या आदिवासी पाड्यावरील पाणी टंचाई दूर होण्यास काही अंशी मदत होणार आहे.

 

चाकरमान्यांची सर्वाधिक पसंती असलेलं शहर म्हणून बदलापूरला ओळखले जाते. त्यामुळे साहजिकच येथील नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी येथील नागरी संस्था व प्रशासनही तत्पर असते. मात्र असे असले तरीही येथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला कवट्याची वाडी हा आदिवासी पाडा मात्र सामान्य मुलभूत सुविधांपासून अगदी आजही दूर आहे. एवढेच काय तर साध्या हंडाभर पाण्यासाठी येथील नागरिकांना दररोज अर्धा ते एक किलोमीटरची पायपीट करावी लागते आहे. अगदी बारा महिने येथील आदिवासी बांधवांना हा त्रास सहन करावा लागत असे.

- Advertisement -

मात्र ही बाब बदलापूर येथील युथ आँफ टुडे फौंडेशनच्या स्वयंसेवकांच्या लक्षात येताच त्यांनी येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी येथील डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्याचे अर्थात ओढ्याचे पाणी अडवून त्याचा वापर येथील आदिवासी बांधवांना करता यावा यासाठी योजना आखली. यानुसार डोंगराच्या पायथ्याशी व लोकवस्ती पासून जवळच या झऱ्यावर बंधारा बांधण्याचे ठरवले. त्यासाठी या स्वयंसेवकांनी रेती भरलेल्या गोण्यांचा वापर करुन पर्यावरण पूरक वनराई बंधारा बांधण्यास सुरुवात केली आहे. फौंडेशनचे सुमारे पंचवीस हून अधिक स्वयंसेवक व अँक्टिव्हीटी सेंटर ची मूले यासाठी श्रमदान करत आहेत. येत्या रविवार पर्यंत हा बंधारा पूर्णत्वास येऊन येथील आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटण्यास मदत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -