अभिनेत्री रुचिताने बांधली लग्नगाठ, संगीत कार्यक्रम रद्द करुन खेड्यातील लोकांना तांदूळ-डाळीचं वाटप..

आपल्या भावी आयुष्याविषयी सांगताना रुचिता म्हणाली की, ' हा माझ्या आयूष्यातील सर्वात मोठा दिवस आहे.

‘लव लग्न लोचा’फेम अभिनेत्री रुचिता जाधव हीने नुकताच उद्योगपती आनंद माने याच्याशी साखरपुडा केला होता. साखरपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत रुचिताने ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. आता रुचिताने अखेर आनंद माने यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. ३ मे रोजी अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. आपल्या भावी आयुष्याविषयी सांगताना रुचिता म्हणाली की, ‘ हा माझ्या आयूष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. बंगल्यामध्ये तीन दिवस विवाह सोहळा पार पडला. पहिल्या दिवशी साखरपुडा आणि मेहंदीचा कार्यक्रम झाला. २०१३ मध्ये एक अंगठी मला खूप आवडली होती. त्याची माहिती माझ्या मैत्रिणींनी आनंदला दिली आणि त्याने अगदी तशीच अंगठी माझ्यासाठी तयार करून घेतली. ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच खास होती. खरे तर या बंगल्याच्या बाहेरच्या आवारात लग्नसोहळा होणार होता. परंतु अचानक पाऊस आल्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला आतमध्ये करावा लागला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchita Jadhav (@ruchitavijayjadhav)

विशेष म्हणजे रुचिता आणि आनंद यांनी लग्नसोहळ्यामध्ये संगीत कार्यक्रम रद्द करुन डाळ आणि तांदुळाची १५०० पाकीटे पाचगणी परिसरात असलेल्या खेड्यामध्ये वाटली. किमान इतकी तरी मदत आम्ही नक्कीच करु शकणार होतो. त्यामुळे आम्ही या गावात जाऊन प्रत्येक व्यक्तीला अडीज किलो तांदूळ आणि अडीज किलो डाळ वाटली. अशा प्कारे आम्ही आमचा संगीत सोहळा पार पाडल्याचे रुचिताने सांगितले.


हे वाचा-   कंगनाची KOO एपवर एन्ट्री, म्हणाली ‘भाड्याचे घर हे भाड्याचंच असतं’…