घरमनोरंजनरणवीर सिंहच्या समर्थनार्थ अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीनं शेअर केली पोस्ट

रणवीर सिंहच्या समर्थनार्थ अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीनं शेअर केली पोस्ट

Subscribe

काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर अभिनेत्री आलिया भट्ट, विद्या बालन, उर्फी जावेद यांनी रणवीरची पाठराखण केलेली होती. आता या यादीत

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. एका मॅगजीनसाठी त्याने हे फोटोशूट केलं होतं. यावेळी त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, शिवाय काही जणांनी तर त्याच्या अतरंगी फोटोंवर मिम्स सुद्धा तयार केले. दरम्यान आता, रणवीर सिंहच्या समर्थन करण्यासाठी अनेक कलाकार त्याची पाठराखण करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर अभिनेत्री आलिया भट्ट, विद्या बालन, उर्फी जावेद यांनी रणवीरची पाठराखण केलेली होती. आता या यादीत अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सुद्धा नाव जोडलं जात आहे.

अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर रणवीर सिंहच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिलंय की, “रणवीरने महिलांच्या भावनांना ठेच पोहोचवली आणि त्यांच्या मर्यादांचा अपमान केला. न्यूड फोटोशूटसाठी रणवीर सिंहवर २ तक्रारी दाखल करण्यात आल्या.” रणवीरच्या या फोटाला शेअर करत सुमोना चक्रवर्तीने लिहिलं की, “मी एक स्त्री आहे. माझ्या मर्यादेचा अपमान झालेला नाही आणि माझ्या भावनांना ठेच सुद्धा पोहोचली नाही.”

- Advertisement -

सुमोना चक्रवर्तीने या स्टोरी सोबतच तिच्या आईच्या मॅसेजचा एक स्क्रिनशॉर्ट सुद्धा शेअर केला आहे. तिच्या आईने मॅसेजमध्ये लिहिलंय की, “फोटो खूप छान आहेत. देवाला माहित कोणाच्या भावना दुखावल्या आहेत. बहुतेक त्यांना अजून काहीतरी पाहायचं असेल.” हे शेअर करत सुमोना चक्रवर्तीने लिहिलं की, “ही तर माझी आई आहे. एका महिलेला सुद्धा हे सांगायचं होतं.”

- Advertisement -

चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने केली तक्रार
रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. त्या स्वयंसेवी संस्थेच्या मते, “भारत संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला नायक म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांना फॉलो करतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये. असं तक्रारीत चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. या संस्थेने रणवीर सिंहवर कलम २९२,२९३, ३५४ आणि ५०९, ६७अ हे कलम लावण्यात आले आहेत.


हेही वाचा :आलिया भट्ट, पूनम पांडेनंतर उर्फी जावेदनेसुद्धा केलं रणवीरचं समर्थन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -