घरमहाराष्ट्रपुणेBJP : संजय काकडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; भाजपाश्रेष्ठी बदलणार पुण्याचा उमेदवार?

BJP : संजय काकडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; भाजपाश्रेष्ठी बदलणार पुण्याचा उमेदवार?

Subscribe

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी फॉर्म भरण्यात आला. मात्र अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून काही ठिकाणी उमेदवार जाहीर झालेले नाहीत. जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी काही ठिकाणी जाहीर झालेल्या उमेदवारांना बदलण्याची मागणी समोर येताना दिसत आहे. भाजपाने मुरलीधर मोहाेळ यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आता भाजपा नेते संजय काकडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर भाजपाश्रेष्ठी पुण्याची उमेदवारी बदलणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होताना दिसत आहे. (BJP Sanjay Kakads Facebook post in discussion Pune candidate will change BJPs reputation)

हेही वाचा – Politics : कट्टर विरोधकांची शिवनेरीवर भेट; अमोल कोल्हेंनी अढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला

- Advertisement -

संजय काकडे नाराज असल्याच्या चर्चांमुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. याप्रसंगी संजय काकडे यांनी आपले म्हणणे रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मांडले. यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट करत रवींद्र चव्हाण आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहाेचतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

- Advertisement -

संजय काकडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माझे मित्र रवींद्र चव्हाण यांनी आज माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली. यावेळी मी माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातील उमेदीची 10 वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली, हे मी त्यांना सविस्तर सांगितले. तसेच, पुणे लोकसभा मतदार संघातील वास्तव स्थितीदेखील मी त्यांना सांगितली आहे.

हेही वाचा – Prakash Ambedkar : संजय राऊत किती खोटं बोलाल; आंबेडकरांकडून संताप व्यक्त

मी त्यांना सांगितलेल्या माझ्या वेदना आणि पक्ष हिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मला या भेटी दरम्यान दिला. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील अशी आशा आहे. संजय काकडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर मुरलीधर मोहाेळ यांच्याकडून उमेदवारी काढून घेत भाजपा दुसरा उमेदवार देणार का? हे पाहावे लागेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -