घरमनोरंजन'ऐ वतन मेरे वतन'चा ट्रेलर लॉन्च, सारा झळकणार मुख्य भूमिकेत

‘ऐ वतन मेरे वतन’चा ट्रेलर लॉन्च, सारा झळकणार मुख्य भूमिकेत

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत असलेला ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटात सारा अली खान देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. 1942 च्या भारत छोडो आंदोलनावर हा चित्रपट आधारित आहे. तसेच उषा मेहता यांच्या योगदानाची कथा या चित्रपटात मांडण्यात आलीये. हा चित्रपट 21 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपट उषा मेहता यांचा बायोपिक आहे. यामध्ये उषा मेहता यांची भूमिका सारा अली खान साकारणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उषा मेहता यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलरमध्ये सारा अली खान रेडिओ जॉकीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

- Advertisement -

 या ट्रेलरमध्ये असं दाखवण्यात आलंय की, सारा अली खान ही हातात तिरंगा घेतलेली दिसते. तो काळ १९४२ मधील मुंबईचा आहे. बॅकग्राउंडमधून आवाज येतो, इंग्रजांनी भारताची जी गत केली आहे त्याचा आपण गांभीर्यानं विचार करायला हवा. आपण काय विचार करायचा, काय बोलायचं आणि काय करायचा हे सगळं इंग्रजांनी का ठरवायचं, हे सगळं मोडून काढायला हवं. असं म्हणत उषा आक्रमक होते. तिचा तो निर्धार खूप काही सांगून जाणारा आहे.

या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी केली आहे. तसेच कन्नन अय्यर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. या चित्रपटाची कथा अय्यर आणि दरब फारुकी यांनी लिहिली आहे. यामध्ये सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे, तर इमरान हाश्मी, सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, ॲलेक्स ओ’नील आणि आनंद तिवारी हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. ‘ए वतन मेरे वतन’ 21 मार्च रोजी भारतासह 240 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही या चित्रपट भेटीला येणार आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्यपूर्व काळाची गोष्ट या चित्रपटात सांगितली असून उषा मेहता यांची भूमिका साकारणारी सारा ही भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. त्यासाठी ती गुप्तपणे एक रेडिओ स्टेशन चालवते आणि हे रेडिओ स्टेशन भारत छोडो आंदोलनासाठी सर्वात मोठे इंधन बनते. असा सर्वसाधारणपणे या सिनेमाचा आशय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -