घरमनोरंजन'सावट' चित्रपटात स्मिता दुहेरी भुमिकेत

‘सावट’ चित्रपटात स्मिता दुहेरी भुमिकेत

Subscribe

गेले काही वर्ष आपल्या व्यक्तिरेखांमूळे स्मिता तांबे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच फिल्मव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करतेय. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या ‘सावट’ या सिनेमाची निर्मिती ‘निरक्ष फिल्म्स’ आणि ‘लेटरल वर्क्स प्रा लि.’ सोबतच स्मिता तांबेचे ‘रिंगींग रेन’ प्रॉडक्शन हाऊस करत आहे.

सावट सिनेमात स्मिता इन्स्पेक्टर आदिती देशमुखच्या भूमिकेतही दिसणार आहे. “उंबरठा आणि ‘जैत रे जैत’च्या स्मिता पाटील यांच्या भूमिका, ‘एक होता विदुषक’ सिनेमातली मधु कांबीकरांची भूमिका, स्मिता तळवलकरांची ‘चौकट राजा’मधली भूमिका, ‘उत्तरायण’मधली नीना कुलकर्णींची भूमिका या आणि अशा सशक्त स्त्री व्यक्तिरेखांनी कायम माझ्या मनावर गारूड केलंय. म्हणूनच कदाचित मला अभिनय क्षेत्रात नेहमीच सशक्त महिलांच्याच भूमिका आकर्षित करत राहिल्यात. सीबीआय ऑफिसर आदिती देशमुखची भूमिकाही अशीच सशक्त, हुशार पोलिस अधिका-याची असल्याचं स्मिता म्हणाली”

- Advertisement -

‘सावट’मध्ये अभिनय करण्यासोबतच सिनेमाची निर्मितीही करण्याबबात स्मिता म्हणते, “सौरभ फिल्म घेऊन आला तेव्हा मला चित्रपटाची कथा एवढी आवडली की, मी सिनेमात काम करण्यासोबतच या सिनेमाची निर्मिती करायचे ठरवले. “खरं तर, सिनेमाची रिलीज डेट ठरवताना, असं मुद्दामहून काहीच ठरवलं नव्हतं. पण त्यानंतर आता हा योगायोग लक्षात येतोय. ही खूप छान गोष्ट आहे की, एक सुपरनॅचरल थ्रिलर सिनेमातून महिला सबलीकरणाचा एक वेगळा विचार घेऊन येताना आम्ही तो मार्चमध्येच आणतोय.”

सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ चित्रपटात श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे  मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला  संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -