‘लाल सिंह चड्ढा’, ‘रक्षाबंधन’नंतर आता शाहरूखच्या ‘पठाण’वर देखील बहिष्कार

कत्याच काही दिवसांपासून आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' या चित्रपटांवर सोशल मीडियावर प्रचंड विरोध केला जात आहे. आता यादरम्यान, अभिनेता शाहरूख खानच्या 'पठाण' चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.

हिंदी चित्रपटांविरोधात मागील अनेक दिवसांपासून बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर बॉलिवूडमधील येणाऱ्या कोणत्याना कोणत्यातरी चित्रपटाला विरोध केला जात आहे. नुकत्याच काही दिवसांपासून आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या चित्रपटांवर सोशल मीडियावर प्रचंड विरोध केला जात आहे. आता यादरम्यान, अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर देखील बहिष्कार टाकला जात आहे.

शाहरूखच्या ‘पठाण’वर देखील बहिष्कार 

आमिर खानचा लाल सिंह चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतरही सोशल मीडियावर त्या चित्रपटावर बहिष्कार टाकला जात आहे. दरम्यान, आता ट्रोलर्स शाहरूख खानच्या पठाण चित्रपटावर देखील हात बहिष्कार टाकायला सुरूवात केली आहे. आता ट्वीटरवर पठाण चित्रपटावरील बहिष्कार ट्रेंड होत आहे. त्यामुळे पठाण प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटासाठी समस्या निर्माण झाली आहे. परंतु या चित्रपटावर बहिष्कार का टाकला जात आहे याचं कारण अजून समोर आलं नाही.

या दिवशी होणार पठाण प्रदर्शित
शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांचा आगमी ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटातील शाहरूख आणि दीपिकाचा लूक समोर आला होता. परंतु सध्या ट्वीटरवर या चित्रपटावर बहिष्कार टाकला जात आहे.