घरमनोरंजनशेतकरी आंदोलनाला पाठींबा न दिल्याने अजय देवगणची अडवणूक

शेतकरी आंदोलनाला पाठींबा न दिल्याने अजय देवगणची अडवणूक

Subscribe

गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहेत. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक शेतकरी अडून आहेत. या आंदोलनात जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींपासून ते बॉलिवूडमधील काही कलाकारांनी पाठिंबा दिला. परंतु काही बॉलिवूड सेलिब्रिटीसने याविषयापासून दूर राहणे पसंत केले. यामध्ये अभिनेता अजय देवगणचाही समावेश होता. अजय देवगणणे शेतकरी आंदोलनापासून स्वत:ला दूर ठेवणे पसंत केले. मात्र आज गोरेगाव येथे एका तरुणाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा का देत नाही याचा जाब विचाण्यासाठी अजय देवगणची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. राजदीप सिंग (२८) असे या तरुणाचे नाव असून त्याला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे

अजय देवगण आज सकाळी ९ च्या सुमारास गोरेगाव पूर्व संतोष नगरहून गोरेगाव फिल्म सिटीला जात असताना हा प्रकार घडला. फिल्मसिटी परिसरात जवळपास १५ ते २० मिनिटे हा गोंधळ सुरूच होता.  यावेळी अजयसोबत उपस्थित स्टाफने पोलिसांना संपर्क करत बोलावून घेतले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अजय देवगणची या तरुणापासून सुटका केली. याप्रकरणात राजदीप सिंग (२८) या तरुणाला दिंडोशी पोलिसांकडून कठोर चौकशी सुरु आहे. अटक करण्यात आलेला तरुण हा गोरेगाव संतोष नगर या ठिकाणी राहणारा असून पेशाने वाहन चालक आहे.

- Advertisement -

हेही वाचा- शिवसेना नेत्यांमुळे जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलमध्ये हलवा- कंगना रानौत

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -