घरमनोरंजनTanhaji Poster: तान्हाजी चित्रपटातील काजोलचा दमदार लूक रिव्हील

Tanhaji Poster: तान्हाजी चित्रपटातील काजोलचा दमदार लूक रिव्हील

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल स्टारर चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे आणि लवकरच याचा ट्रेलर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरपुर्वीच अजय देवगणने चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज केले आहे. यामध्ये काजोलच्या भूमिकेची ओळख त्याने करून दिली आहे. यामध्ये काजोल सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारणार आहे. यापुर्वी अजय, सैफ अली खानसह अनेकांचे लूक रिव्हील करण्यात आले होते.

या चित्रपटामध्ये काजोल मराठी गेटअपमध्ये दिसणार आहे. अजयने चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना असे लिहिले की, ‘सावित्रीबाई मालुसरे- तान्हाजी के साहस का सहारा… और उनके बल की शक्ति।’ यापुर्वीही चित्रपटाचे तीन टीझर समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार तान्हाजी मालसुरे यांच्या आधारलेला असून काजोल यामध्ये सावित्री बाई मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -

येणाऱ्या वर्षात १० जानेवारी रोजी तान्हाजी: द अनसंग वॉरियर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचे पोस्टर १८ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. यापुर्वी या चित्रपटाचा टिझर संजय मिश्रा यांच्या आवाजात आला होता. त्याच्या आवाजावरून अशी शक्यता वर्तवण्यात येते की, ट्रेलरमध्ये ही त्यांच्या प्रभावी आवाजातील संवाद असणार आहे. त्यामुळे चित्रपटाचा दमदार ट्रेलर समोर येईल.


आगामी ‘तानाजी’ साठी अजयने जाणून घेतला मराठा इतिहास

- Advertisement -


#Tanhaji : अजय देवगणचा फर्स्ट लूक रिलीज!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -