अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा ‘सेल्फी’ या दिवशी होणार प्रदर्शित

अक्षय कुमार, इमरान हाशमी, नुसरत भारूचा आणि डायना पेंटी यांचा 'सेल्फी' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय कुमार आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेता इमरान हाशमी सध्या त्यांच्या ‘सेल्फी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या चित्रपटाचे रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून या दोघांचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. आता नुकत्याच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे.

२०२३ मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट

अक्षय कुमार, इमरान हाशमी, नुसरत भारूचा आणि डायना पेंटी यांचा ‘सेल्फी’ चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय कुमार आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने या चित्रपटासंबंधीत माहिती आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केली आहे. ज्याच्यानुसार, २४ फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या साउथ चित्रपटाचा रिमेक आहे अक्षय कुमारचा ‘सेल्फी’
अक्षय कुमार, इमरान हाशमी, नुसरत भारूचा आणि डायना पेंटी यांचा सेल्फी चित्रपट साउथच्या ‘ड्राइविंग लायसन्स’ या विनोदी चित्रपटाचा हिंदी रीमेक असणार आहे. साउथच्या या चित्रपटात दीप्ति सती आणि सूरज वेंजरामूदु मुख्य भूमिकेत होते.

दरम्यान, अक्षय कुमारचा ११ ऑगस्ट रोजी ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच तो येत्या काळात जॅकलीन फर्नांडीस आणि नुसरत भरूची सोबत ‘राम सेतु’ चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. तसेच इमरान हाशमी येत्या काळात सलमान खान आणि कॅटरीना कॅफच्या ‘टायगर ३’ मध्ये दिसून येणार आहे.


हेही वाचा :‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील बहुप्रतिक्षित ‘केसरिया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; गाणं पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव