घरमनोरंजनबघा 'चुंबक'चं दुसरं पोस्टर

बघा ‘चुंबक’चं दुसरं पोस्टर

Subscribe

अक्षय कुमारची निर्मिती असलेला 'चुंबक' उद्या या सिनेमाचा टीझर ट्रेलर रिलीज होणार आहे. या आधी अक्षयने या सिनेमाचे दुसरे पोस्टर रिलीज केले आहे.

काहीच दिवसांपूर्वी अक्षय कुमारने त्याच्या ‘चुंबक’ या मराठी सिनेमाचं पोस्टर नुकतच शेअर केले होते. आता या सिनेमाचे आणखी एक पोस्टर अक्षय कुमारने शेअर केले आहे. त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. येत्या २७ जुलैला हा सिनेमा रिलीज होत असून पोस्टरने सिनेमाची उत्कंठा वाढवली आहे.

एकापेक्षा एक कॅरेक्टर

खिलाडी कुमारचं मराठी प्रेम काही नवीन नाही. खट्टा मिट्टा या सिनेमात अक्षयने साकारलेला सचिन टिचकुले या मराठमोठ्या तरुणाची भूमिका साकारली होती. तो अनेक कार्यक्रमात आवर्जून मराठीतून एक- दोन वाक्य म्हणतोच. त्यामुळे अक्षयचे मराठी प्रेम अनेकांना माहित आहे. आता त्याने निर्मिती केलेला सिनेमाचं येत आहे म्हटल्यावर त्याचे प्रमोशन मराठीतून अक्षय करणार याचा अंदाज होताच. या सिनेमाचे पोस्टर शेअर करत ‘एकापेक्षा एक कॅरेक्टर बाळू, डिस्को आणि प्रसन्ना’ असा उल्लेख केला आहे. या सगळ्या कॅरेक्टरचे विशेष देखील या पोस्टरमधून बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

उद्या येणार टीझर

सिनेमाचे पोस्टर आले की, मग लगेच त्याचं टीझर कधी येणार ? अशी उत्सुकता असते. त्यामुळे या पोस्टरसोबत या सिनेमाचा टीझर गुरुवारी येणार असल्याची नोंद केली आहे. उद्या १२ वाजता या सिनेमाचे टीझर रिलीज होणार आहे.

वाचा-अक्षय कुमारचा ‘मराठी’ सिनेमा! नवं पोस्टर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -