घरमनोरंजनअक्षय कुमारचा 'मराठी' सिनेमा! नवं पोस्टर रिलीज

अक्षय कुमारचा ‘मराठी’ सिनेमा! नवं पोस्टर रिलीज

Subscribe

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार पुन्हा एक नवा मराठी सिनेमा घेऊन येतो आहे. अक्षयच्या या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय.

बॉलीवूडचे आघाडीचे कलाकारही आता मराठी सिनेसृष्टीमध्ये उतरु लागले आहेत. निर्मिती, अभिनय अशा विविध क्षेत्रातून अनेक हिंदी कलाकार मराठी सिनेसृष्टीत काम करत आहेत. याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. मग ते प्रियांका चोप्राचा ‘व्हेंटिलटर’ असो किंवा अजय देवगण प्रॉडक्शनचा ‘आपला माणूस’. बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा एक मराठी सिनेमा घेऊन येतो आहे. त्याच्या या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच लाँच झालं आहे.

‘चुंबक’ सिनेमाची सर्वत्र चर्चा

अक्षय कुमार याची प्रस्तुती असलेल्या ‘चुंबक’ सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. नुकतीच या सिनेमाची दोन नवीन पोस्टर रिलीज झाली आहेत. डाव्या बाजूच्या पोस्टरवर आहेत ‘प्रसन्न ठोंबरे’ तर उजव्या बाजूच्या पोस्टरवर आहे ‘डिस्को’. प्रसन्न ठोंबरे आणि डिस्को ही सिनेमातली पात्रं असून अनुक्रमे स्वानंद किरकिरे आणि संग्राम देसाई ही पात्रं साकारणार आहेत. गीतकार, संगीतकार आणि लेखक अशी ओळख असलेले ‘स्वानंद किरकिरे’ यानिमित्ताने पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

- Advertisement -

‘चुंबक’ कोणाची गोष्ट?

सोलापूरच्या छोट्याशा गावात राहणाऱ्या एका माणसाची ही गोष्ट आहे. हा माणूस चारचौघांसारखा नसून गतीमंद आहे. सिनेमाच्या कथेमध्ये त्याचं भावविश्व उलगडण्यात आलं आहे. या गतीमंद माणसाचा प्रवास आणि प्रवासादरम्यान त्याला भेटणारी लोकं तसंच त्याला येणारे अनुभव यांची गुंफण कथेमध्ये करण्यात आली आहे. स्वानंद किरकिरे यांनी ही व्यक्तिरेखा साकारली आहे.

- Advertisement -

स्वानंद यांनी मानले आभार

विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये, स्वानंद किरकिरे यांना या भूमिकेसाठी ‘सर्वोतकृष्ट अभिनयाचा’ पुरस्कार मिळाला आहे. फेस्टिव्हल दरम्यान आपला अनुभव शेअर करताना किरकिरे म्हणाले की, ‘पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारायची होती आणि त्यातही गतिमंद पुरुषाची. त्यामुळे ही भूमिका साकारणं माझ्यासाठी खरंच आवाहन होतं. मात्र केवळ सर्वांच्या पाठिंब्यामुळेच मी ती साकारु शकलो.’ याप्रसंगी किरकिरे यांना सिनेमातील सहकलाकारांसोबत निर्माता, दिग्दर्शक आदी संपूर्ण टीमचे आभार मानले.

अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला ‘चुंबक’ हा सिनेमा २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. यआधी ‘७२ मैल एक प्रवास’ या मराठी सिनेमच्या निर्मितीतही अक्षयचा सहभाग होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -