‘या’ चित्रपटासाठी अक्षयने मोडला १८ वर्षापूर्वीचा नियम!

अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटासाठी काही नियम आखून घेतले आहेत. गेले १८ वर्ष तो हे नियम पाळत आहे. मात्र नुकतंच अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’ चित्रपटासाठी गेल्या १८ वर्षांपासून आखून ठेवलेला एक नियम मोडला आहे. कोरोना संकटामुळे अडकलेल्या या चित्रपटाचं सध्या स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण सुरु आहे.

स्कॉटलंडमध्ये पोहोचल्यानंतर १४ दिवस क्वारंटाइन राहावं लागल्याने निर्मात्यांच्या नुकसानाची कल्पना असल्याने अक्षय कुमारने मदतीसाठी धाव घेतली. यावेळी त्याने आपल्या १८ वर्षांचा नियम मोडला. गेल्या १८ वर्षांपासून अक्षय कुमारने दिवसातून आठ तास काम करण्याचा नियम केला आहे. पण ‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या निर्मात्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अक्षय कुमारने डबल शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

‘बेल बॉटम’ या चित्रपटाचा निर्माता जॅकी भगनानी आहे. रंजित तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, येत्या काळात अक्षयचे ‘सूर्यवंशी’ ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’ ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे एकूण सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसंच लवकरच तो ‘बाप रे बाप’ या चित्रपटातही झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.


हे ही वाचा – ‘होय, दिशावर सामूहिक बलात्कार झाला’, प्रत्यक्षदर्शीने सांगितली त्या रात्रीची भयानक कथा