घरमनोरंजनअक्षय कुमारच्या बहुचर्चित 'राम सेतू' च्या शूटिंगला ऑक्टोबरपासून सुरुवात

अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘राम सेतू’ च्या शूटिंगला ऑक्टोबरपासून सुरुवात

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अनेक नवनव्या विषयांवर आधारित सिनेमांमध्ये आगामी काळात झळकणार आहे. यातीलच ‘राम सेतू’ हा त्याचा एक बहुचर्चित सिनेमा आहे. ‘राम सेतू’ या सिनेमामुळे अक्षय कुमार चर्चेत आहे. अशातच ऑक्टोबर महिन्यापासून अक्षय कुमार ‘राम सेतू’च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. मार्च महिन्यात अयोध्यामध्ये सिनेमाचा मुहूर्त सोहळा पार पडला. यानंतर मुंबईत सिनेमाच्या लांबलचक चित्रिकरणाला सुरुवात होणार होती. मात्र लॉकडाऊनमुळे सिनेमाचे शुटिंग लांबणीवर पडले. मात्र ऑक्टोबरपासून ‘राम सेतू’च्या चित्रीकरणास नवा मुहूर्त सापडलाय.

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार ऑक्टोबर महिन्यापासून ‘राम सेतू’ सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात करणार असून डिसेंबरपर्यंत शुटिंग पूर्ण होईल. या चित्रपटातील काही भाग श्रीलंका देशात शुट होणार होता. मात्र निर्मात्यांनी देशाबाहेर जाण्यापेक्षा शुटिंग केरळमध्ये करण्याचा निर्णय घेतला. शेवटी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्मात्यांनी केरळपेक्षा काही भाग गुजरातमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

या चित्रपटात अक्षय पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार असल्याचेही दिग्दर्शकाने सांगितले आहे. अक्षयच्या चाहत्यांना ‘राम सेतू’मधील त्याचा नवा लूक आणि नवे पात्र लवकरच पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक अभिषेक शर्मा रामसेतु सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा आणि त्यासंबंधीत घटना मोठ्या पडद्यावर आणणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. अक्षयसमवेत ‘राम सेतू’ या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिसही दिसणार आहेत.

अक्षय कुमारने नुकतचं आपल्या आगामी बच्चन पांडे चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले. त्याच सुर्यवंशी ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सूर्यवंशी प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -