Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया आयसीयूमध्ये दाखल

अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया आयसीयूमध्ये दाखल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा बाटिया यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आईची प्रकृती ठीक नसल्याचं कळताचं अक्षय कुमार तातडीने सोमवारी पहाटे लंडनहून मुंबईला येण्यासाठी निघाला. गेल्या अनेक दिवसांपासून अरुणा यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. हिंदुस्तान टाइम्स’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अक्षय कुमार आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनमध्ये होता, मात्र आईची तब्येत खालावल्याने अक्षय तातडीने लंडनहून परतण्यासाठी निघाला आहे. गेल्या अक्षय आगामी ‘सिंड्रेला’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. सोमवारी पहाटे तो मुंबईला परतला आहे. जेणे आईला आजारपणात धीर देता येईल. चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावर सोडल्याने अक्षयने निर्मात्यांना तो नसलेल्या सीनचे शूटिंग चालू ठेवा असं सांगितलं आहे. तसेच खाजगी अडचणी असल्या तरी शुटिंगवर परिणाम होऊ नये याची काळजी त्याने घेतली आहे.

- Advertisement -

अरुणा भाटिया या ७७ वर्षांच्या आहेत. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या गुडघ्यावर सर्जरी झाली. निर्मात्या असलेल्या अरुणा यांनी बॉलिवूडमधील अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. यामध्ये ‘हॉलिडे’, ‘रुस्तम’ या चित्रपटांचा समावेश आहे.


 

- Advertisement -