ओटीटीवर सुपरहिट ठरला अक्षय कुमारचा ‘कठपुतली’ चित्रपट; तर अजय देवगणची ‘रुद्र’ सीरिज ठरली लोकप्रिय

2022 मध्ये बॉलिवूडमधील काही मोजक्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यंदा अभिनेता अक्षय कुमार लागोपाठ सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले. दरम्यान, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला अक्षय कुमारसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 2022 मध्येच ओटीटीवर प्रदर्शित झालेला अक्षयचा कठपुतली हा चित्रपट ओटीटीवरील सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारची ‘कठपुतली’ चित्रपट आणि अजय देवगणची ‘रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ ही वेब सीरिज ओटीटीवरील सर्वाधिक पाहिले गेले आहेत. अक्षय कुमारच्या ‘कठपुतली’ चित्रपटानंतर यामी गौतमच्या ‘द थर्सडे’चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विक्की कौशलचा ‘गोविंदा नाम मेरा’चित्रपट असून चौथ्या क्रमांकावर दीपिकाचा ‘गहराइया’ चित्रपट आहे. तसेच पाचव्या क्रमांकावर कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’ चित्रपट आहे.

ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेली वेब सीरिज

ओटीटीवर अजय देवगणची ‘रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ सर्वाधिक पाहिले गेलेली वेब सीरिज आहे. यामध्ये अजय देवगणसोबत ईशा देओल आणि राशि खन्ना देखील आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बॉबी देओलची ‘आश्रम’ वेब सीरिज आहे. तिसऱ्या क्रमांकावर जितेंद्र कुमारची ‘पंचायत 2’ तर चौथ्या क्रमांकावर ‘जस्टिस’ आणि पाचव्या क्रमांकावर ‘The Great Indian Murder’ ही वेब सीरिज आहे.


हेही वाचा :

शाहिद कपूर आणि विजय सेतूपती यांच्या ‘फर्जी’ सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित