आंतरराष्ट्रीय प्रभावशाली महिलांच्या यादीत आलिया भट्टचे नाव

new momma alia bhatt glamorous look viral on social media

नवी दिल्ली : आलिया भट्ट आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. ही सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री असून तिने आतापर्यंत एकापेक्षा एक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली आहे. तिच्या अभिनयामुळे तिची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. बॉलिवूडमध्ये आपला दमदार अभिनय दाखवल्यानंतर आलिया भट्ट आता हॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावताना दिसणार आहे. पण त्याआधी आलिया भट्टसाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अलीकडेच आलिया भट्टला 2023 च्या सर्वात प्रभावशाली आंतरराष्ट्रीय महिलांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

आलिया भट्टच्या २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले. आता 2023 च्या प्रभावशाली आंतरराष्ट्रीय महिलांच्या यादीत आलियाचे नाव आल्यानंतर तिचा आणि तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आलियाने स्वतः तिच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली. आलियाशिवाय, या यादीत HBO हिट हाउस ऑफ द ड्रॅगन – मिली अल्कॉक, एमिली केरी, ऑलिव्हिया कुक, एम्मा डी’आर्सी, सोनोया मिझुनो या अभिनेत्रींचा समावेश असून या यादीत स्पॅनिश गायिका रोसालियाचेही नाव आहे.

आलिया भट्ट करण जोहरच्या आगामी रॉकी आणि राणी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 28 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेबद्दलही आलिया खूप उत्सुक आहे. याबद्दल ती म्हणाली की, शेवटी बर्फात साडी नेसायला मिळाली आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. याशिवाय आलिया प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटातही दिसणार आहे. या दोन चित्रपटांशिवाय ती ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.