‘आय प्रेम यु’ चित्रपटाचा कलरफुल ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : एका मुलीविषयी वाटणाऱ्या आपुलकीचे प्रेमात होणार रुपांतर आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडींचे कलरफुल चित्रण असलेल्या ‘आय प्रेम यु’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेम याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू ‘आय प्रेम यु’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
‘आय प्रेम यु’ या चित्रपटाची निर्मिती साईश्री एंटरटेन्मेंटच्या मधुकर गुरसळ, नितीन कहार यांनी केली असून नितीन कहार यांनीच लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, संजू-संग्राम आणि यशोधन कदम यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहार या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करत असून, कयादू आणि अभिजीत आमकर ही फ्रेश जोडी या चित्रपटात प्रेक्षकांन पाहायला मिळणार आहे.
एकतर्फी प्रेमाला मिळणारी वागणूक, त्यातून होणारे मनोव्यापार या ट्रेलरमधून पाहायला मिळतात. कलरफुल आणि म्युझिकल अशी ही प्रेमकथा ट्रेलरमधूनच लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती चित्रपटाला चित्रपटगृहात खेचून आणेल यात शंका नाही.