‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या पहिल्या पोस्टरमध्ये आलिया-रणवीरचा हटके लूक

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या त्यांच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची चाहते मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जौहरने केलं असून आज करण जौहरच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. जे पाहून प्रेक्षक आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चा पहिला पोस्टर आउट

या चित्रपटाची निर्मिती करण जौहरने केली असून आज त्याचा 51 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेल्या पहिल्या पोस्टरमध्ये आलिया देसी लूकमध्ये दिसत आहे तर रणवीर त्याची बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे. या दोघांचे हे लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित होणार

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून दोन्ही कलाकारांचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा हा चित्रपट 28 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन सारखे स्टार्स देखील दिसणार आहेत.

 


हेही वाचा :

विक्की आणि साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच