घरमहाराष्ट्रHSC Result : बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभाग अव्वल, सर्वाधिक कमी निकाल...

HSC Result : बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभाग अव्वल, सर्वाधिक कमी निकाल मुंबई विभागाचा

Subscribe

यंदाच्या वर्षी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल हा 91.25 टक्के लागला आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा 2.97 टक्क्यांनी निकाल घसरल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल राज्यनिहाय निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. आज (ता. 25 मे) सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. यंदाच्या वर्षी सुद्धा बारावीमध्ये कोकण मंडळाने बाजी मारत सर्वाधिक टक्केवारी मिळवली आहे. तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बारावीच्या परिक्षेत बाजी मारली आहे. (12th result, Konkan division tops again, Mumbai division has the lowest result)

यंदाच्या वर्षी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल हा 91.25 टक्के लागला आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा 2.97 टक्क्यांनी निकाल घसरल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून देण्यात आलेली आहे. यावर्षी परीक्षेला 14 लाख 28 हजार 194 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आलेली होती. यातील 14 लाख 16 हजार 371 प्रत्यक्ष विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यांतील 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

- Advertisement -

बारावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 89.14 टक्के इतका लागला आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 4.59 टक्के अधिक मुली यावर्षी उत्तीर्ण झाल्या आहेत.

यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. त्यामुळे विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे. तर 154 विषयांपैकी 23 विषयांचा 100 टक्के निकाल लागला आहे.

- Advertisement -

‘या’ संकेतस्थळावर पाहा निकाल
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी विविध संकेतस्थळांवरून म्हणजेच वेबसाईटवरून पाहता येणार आहे. परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच http://mahresult.nic.inhttp://hscresult.mkcl.org आणि http://mahresults.org.in या लिंकवर जाऊनही विद्यार्थी आणि पालक निकाल पाहू शकतात.

05 जूनला महाविद्यालयात मिळणार गुणपत्रिका
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. पण त्यानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतिक्षा होती ती निकालाची. निकालाची तारीख उद्याची असल्याने उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शाखानिहाय निकाल
कला – 84.05 टक्के
विज्ञान – 96.09 टक्के
वाणिज्य – 90.42 टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम – 91.25 टक्के

राज्याचा विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे – 93.34 टक्के
नागपूर – 90.35 टक्के
औरंगाबाद – 91.85 टक्के
मुंबई – 88.13 टक्के
कोल्हापूर – 93.28 टक्के
अमरावती – 92.75 टक्के
नाशिक – 91.66 टक्के
लातूर – 90.37 टक्के
कोकण – 96.01 टक्के

गेल्या पाच वर्षांचा निकाल
2018 – 88.41 टक्के
2019 – 85.88 टक्के
2020 – 90.66 टक्के
2021 – 99.63 टक्के
2022 – 94.22 टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -