घरमनोरंजनBREAKING! अँग्री यंग मॅन रिटायर्ड होतोय! चित्रपटसृष्टीतून अमिताभ बच्चन निवृत्त!

BREAKING! अँग्री यंग मॅन रिटायर्ड होतोय! चित्रपटसृष्टीतून अमिताभ बच्चन निवृत्त!

Subscribe

१९६९ साली प्रदर्शित झालेल्या सात हिंदुस्थानी या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे सिनेसृष्टीचे महानायक अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांनी अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. नागराज मंजुळे याच्या ‘झुंड’ या चित्रपटानंतर कोणताही आणि कोणत्याही भाषेतला चित्रपट करणार नसल्याचं अमिताभ बच्चन यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अमिताभ बच्चन यांनी ही घोषणा केल्यानंतर त्यांच्या मुंबईतल्या जलसा या बंगल्याबाहेर त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड संख्येनं गर्दी केली. अचानक असा निर्णय का घेतला? असा प्रश्न त्यांचे चाहते आता विचारू लागले आहेत.

चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडे अभिनेते

शोले, जंजीर, सत्ते पे सत्ता, दीवार, कुली, नमक हलाल, आनंद अशा एक सो एक चित्रपटांपासून ते थेट अलिकडच्या पिंक, बदला या चित्रपटांपर्यंत अमिताभ बच्चन यांनी चित्रपट सृष्टीवर अक्षरश: अधिराज्य गाजवलं. शोलेनं तर बॉक्स ऑफिसवर सगळेच रेकॉर्ड तोडले. त्यामुळे ८० आणि ९०च्या दशकात आख्खी एक पिढीच अमिताभमय झाली होती. गेल्या काही वर्षांत देखील चित्रपटसृष्टीत सर्वात महागडे अभिनेते म्हणून देखील अमिताभ बच्चन यांचं नाव घेतलं जातं. कलाकारांच्या देखील दोन पिढ्यांसोबत अमिताभ बच्चन यांनी काम केलं आहे. त्यांच्या अलिकडेच रिलीज झालेल्या १०३ नॉटआऊट या चित्रपटातून त्यांनी कित्येक वर्षांनंतर ऋषी कपूर यांच्यासोबत केलेलं काम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं होतं.

- Advertisement -

नेटिझन्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचे तर सर्वच जण चाहते आहेत. एकेकाळी त्यांच्या याच आवाजामुळे त्यांना ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरी नाकारली होती. पुढे जाऊन हाच आवाज त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख मिळवून देणार आहे याची कदाचित तेव्हा त्यांना सूतराम कल्पना नसावी. पण त्यानंतरची सुमारे ४० वर्ष या आवाजानं चित्रपट प्रेमींना अक्षरश: वेड लावलं. पण हा आवाज आता रिटायर्ड होतोय. सोमवारी सकाळीच त्यांनी यासंदर्भातली घोषणा केल्यानंतर त्यांच्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सर्वच सोशल मीडिया अकाउंटवर नेटिझन्सच्या भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी?

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी तडकाफडकी असा निर्णय का घेतला? याविषयी मात्र त्यांनी मौन पाळलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांशी त्यांचे संबंध आले होते. मध्य प्रदेशमध्ये तर त्यांचे कौटुंबिक आणि मित्रत्वाचे संबंध होते. त्यामुळे अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेऊन अमिताभ बच्चन निवडणुकांच्या हंगामात राजकारणात उतरणार का? या चर्चांना आता ऊत आला आहे. काहींनी तर थेट अमिताभ बच्चन यांना भाजप आणि समाजवादी पक्ष या दोघांकडून तिकिटाची ऑफर आल्याचं देखील वृत्त खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. त्यामुळे आजपर्यंत टीव्ही आणि सिनेमागृहांमध्ये घुमणारा अमिताभ बच्चन यांचा धीरगंभीर आवाज लवकरच प्रचारसभांमध्ये ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

एप्रिल फूल!!! 🙂

april fool
एप्रिल फूल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -