अमिताभ बच्चन यांनी पान मसाला कंपनीला पाठवली कायदेशीर नोटीस; कारण आलं समोर…

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन वारंवार त्यांच्या नव्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, आता ते आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महानायक अमिताभ बच्चन यांनी पान मसाला कंपनीला लीगल नोटीस पाठवली आहे. खरंतर त्यांनी त्या पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये काम केले होते. मात्र, त्यांती जाहिरात पाहिल्यानंतर देशभरातून त्यांच्या जाहिरातीवर टिका करण्यात आली. त्यामुळे अमिताभ यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये पान मसाला कंपनीसोबतचे कंत्राट संपवले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, त्यांना याबाबत ठाऊक नव्हते की, या फोटोंचा वापर ते सरोगेट जाहिरातीसाठी करतील.

जाहिरातीवर भडकले अमिताभ बच्चन
पान मसाला ब्रँडसोबत अमिताभ बच्चन यांनी कंत्राट संपवले आहे. परंतु कंपनीकडून अमिताभ यांची जाहिरात दाखवणं अजूनही बंद केलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पान मसाला जाहिरातींचे प्रसारण बंद करण्यासाठी कंपनीला लीगल नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये सांगण्यात आलंय की, कंपनीसोबतचे कंत्राट रद्द केल्यानंतरही कंपनीने अजून जाहिरातीचे प्रसारण थांबवले नाही. अमिताभ बच्चन यांच्या पान मसाल्याची जाहिरात अजूनही दाखवली जात आहे.

मागील काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या पान मसाल्याच्या जाहिरातींना कमर्शियल करण्यात आलं. जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसातच अमिताभ यांनी कंपनीसोबत संपर्क करुन कंत्राट रद्द केलं होतं. सोबकच जाहिरातीचे पैसे देखील परत केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष शेखर सालकर आणि अमिताभ बच्चन यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये पान मसाला नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे लिहिले होते. या जाहिरातामधून अमिताभ यांनी माघार घ्यायला हवी. असं देखील लिहिलं होतं. याआधी अक्षय कुमारने देखील पान मसाला जाहिरातीमुळे वादात सापडला होता.

 


हेही वाचा :

चिरंजीवीचा ‘गॉडफादर’ आता ओटीटीच्या ‘या’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित