ब्लॉगमधून अमिताभ यांनी विक्रम गोखले आणि तबस्सुमच्या आठवणींना दिला उजाळा

मराठीसह हिंदी आणि अन्य भाषिक चित्रपटसृष्टीत आपल्या अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (77) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारपासून त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि ते उपचारांना प्रतिसाद देईनासे झाले. अखेर काल शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळ होते. तसेच विक्रम गोखलेंच्या मृत्यूपूर्वी अभिनेत्री तबस्सुमचे देखील निधन झाले होते. दरम्यान, आता विक्रम गोखले आणि तबस्सुम यांच्या मृत्यूवर
महानायक अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त केला आहे.

अमिताभ यांनी काढली विक्रम गोखले आणि तबस्सुमची आठवण
तबस्सुम 19 नोव्हेंबर रोजी निधन झाले, तर विक्रम गोखले यांचे 26 नोव्हेंबर रोजी निधन झाले. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये क्रम गोखले आणि तबस्सुमची आठवण काढत लिहिलंय की, “गेले काही दिवस निराशाजनक आहेत…मित्र आणि साथी….वेगवेगळे कलाकार एकानंतर एक आपल्याला सोडून जात आहेत…आपण ऐकतो, पाहतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो…तबस्सुम….विक्रम गोखले आणि काही प्रेमळ लोक जे आमच्या जवळचे होते…ते आमच्या आयुष्यात आले….आपली भूमिका केली आणि पुन्हा व्यासपीठाला मोकळं ठेऊन गेले…”

12 महिन्यात ‘या’ कलाकारांनी घेतला जगाचा निरोप
2021-2022 हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी फारच वाईट ठरले असून, या कालावधीत मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील 25 पेक्षा जास्त सेलिबि्टीजनी जगाचा निरोप घेतला. गानकोकिळा लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी 2022 रोजी कोविडनंतर उद्भवलेल्या आजारात निधन झाले. संपूर्ण देशाला या घटनेने धक्का बसला. या घटनेस 9 दिवस पूर्ण होण्याआधीच गोल्डन स्टार ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन झाले. राजीव कपूर, दिलीप कुमार, राज कौशल, तरला जोशी, रमेश देव, अरुण शर्मा, नरेंद्र चंचलपासून प्रवीण कुमार, सि्दधार्थ शुक्ला, दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमार, विक्रमजीत कंवरपाल यांनीही जगाचा निरोप घेतला. त्यानंतर संगीत क्षेत्रातील के. के., राजू श्रीवास्तव, तबस्सुम यांसह अनेक सेलिब्रिटीजची या वर्षात अचानक एक्झिट घेतली.

 


हेही वाचा :

8 वर्षांच्या गुंजन सिन्हाने पटकावली ‘झलक दिखला जा 10’ची ट्रॉफी