अमृता फडणवीस सांगतायत ‘प्यार का गम’, सोशल मीडियावर आगामी गाण्याची चर्चा

अमृता फडणवीस पुन्हा एकदा चाहत्यांसाठी एक सरप्राईज घेऊन आल्या आहेत. अमृता यांचं आणखी एक नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या आगामी गाण्याची चर्चा सुरु आहे.

Great look of Amrita Fadnavis in Western Gown
अमृता फडणवीस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल सोशल मीडियावर सक्रिय असतात त्याचप्रमाणे त्या एक उत्तम बँकर सुद्धा आहेत. त्याचबरोबर त्या अनेक सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा सक्रिय असतात. या सगळ्या क्षेत्रात काम करत असताना अमृता फडणवीस यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. अमृता फडणवीस(amruta fadnavis) पुन्हा एकदा चाहत्यांसाठी एक सरप्राईज घेऊन आल्या आहेत. अमृता यांचं आणखी एक नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या आगामी गाण्याची चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा – ‘या’ भारतीय चित्रपटाचा स्पेन मधील महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश, नेमकं प्रकरण काय?

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेकक्षकांच्या बेहतीला येणार आहे. यासंदर्भात अमृता यांनी ट्विट करून माहिती दिली. अमृता यांनी ट्विट करत या गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. ‘लेकर आ राही हूँ एक यादगार गीत पुराना. लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना’ थँक यू सारेगामा ग्लोबल , कमिंग अप! असं खास कॅप्शन सुद्धा त्यांनी त्या फोटोला दिले आहे. अमृता यांच्या गाण्यावरून त्यांना सोशल मिडियावर संमिश्र स्वपरुपाच्या प्रतिक्रिया येत असतात. पण त्या नेहमीच आनंदी असतात. अशातच त्यांची त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे.

 

हे ही वाचा – ठरलं! ‘या’ तारखेला शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

अमृता फडणवीस यांच्या नव्या गणायची सध्या सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अमृता फडणवीस यांनी या आधी ही गायलेली गाणी हिट ठरली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात प्रामुख्याने अमृता या गायिका म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आल्या.