घरमनोरंजन'या' अभिनेत्रीने चित्रपटासाठी तब्बल १२ किलो वजन केलं कमी!

‘या’ अभिनेत्रीने चित्रपटासाठी तब्बल १२ किलो वजन केलं कमी!

Subscribe

मराठी प्रेक्षकांभूरळ घातल्यानंतर बॉलिवूडमध्येही जी अभिनेत्री आपलं नाव कमवत आहे अशी अमृता खानविलकर लवकर आणखी एका बॉलिवूडच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या आधी ‘राझी’, ‘सत्यमेव जयते’ या हिंदी चित्रपटामध्ये अमृता झळकली. मराठी चित्रपटांप्रमाणे आता बॉलिवूडमध्येही अमृताचं नाव अधिक चर्चेत असते. अमृता लवकरच “मलंग” या बहुचर्चित चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमृताने या भुमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तिने तिचं वजनही कमी केलं आहे.

- Advertisement -

मोहित सुरी दिग्दर्शित “मलंग” या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा अभिनेता अनिल कपूर यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, दिशा पटाणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांचीही एक झलक या ट्रेलर मध्ये आहे. “मलंग” हा नव्या वर्षातला बहुचर्चित चित्रपट असून अमृतासाठीही हा चित्रपट महत्त्वाचा आहे. तिच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी अमृतानं तब्बल १२ किलो वजन कमी केलं आहे.

- Advertisement -

चित्रपटाचा ट्रेलर अतिशय लक्षवेधी आहे. आता या चित्रपटात अमृताच्या वाट्याला काय भूमिका आली आहे, हे लवकरच कळेल. अमृता तिच्या नेहमीच्या शैलीत या चित्रपटात नक्कीच भाव खाऊन जाईल यात शंका नाही. या आधी अमृताच्या राझी चित्रपटातील भुमिकेची खूप चर्चा झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -