घरमनोरंजनअनिल कपूरचा झकास बॅंजो डान्स!

अनिल कपूरचा झकास बॅंजो डान्स!

Subscribe

अभिनेता अनिल कपूर याने त्याच्या आगामी चित्रपट फन्ने खानच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावताना वाजत गाजत एंट्री केली. अनिलचा हा झकास डान्स त्याच्या प्रेक्षकांना नक्कीच पसंत पडेल.

अभिनेता अनिल कपूर नेहमीच त्याच्या अतरंगी प्रकारांमुळे चर्चेत राहिला आहे. दिलखुलास, मनमोकळा आणि सिनेसृष्टीत काम करण्याचा दांडगा अनुभव ही अनिल कपूर यांची खासियत आहे. त्याचाच फायदा घेत अनिल कपूरने आगळ्या वेगळ्या शैलीत एका कार्यक्रमात हजेरी लावली. अनिल कपूर अभिनीत ‘फन्ने खान’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच पार्टीत अनिलने चक्क बॅंजोवर नाचत नाचत आगमन केले. अनिलचा हा झकास डान्स ‘आपलं महानगर’मधील छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अनिलने केवळ नृत्यच केलं नसून त्याचे वाद्य वाजवण्याची कलाही यावेळी सादर केली.

- Advertisement -

‘फन्ने खान’ चा ट्रेलर लाँच सोहळा

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर होण्याचं स्वप्न प्रत्येक सिंगर बघत असतो. त्या दिशेने गायन क्षेत्रातील त्याचा सरावही सुरू असतो. असेच एक स्वप्न अभिनेता अनिल कपूर यांनी फन्ने खान चित्रपटात पाहिलं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्या व्यक्तीरेखेची तयारी आहे. अभिनेता अनिल कपूर, राजकुमार राव, अभिनेत्री ऐश्वर्या राय, दिव्या दत्ता आणि पिहू संद या कलाकारांचा ‘फन्ने खान’ हा चित्रपट ३ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचं ट्रेलर आज, शुक्रवारी सकाळी वांद्रे, बीकेसीतील फेसबुक १ येथे एका कार्यक्रमामध्ये रिलीज करण्यात आहे. स्वतःला ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी बनायचे असतानाही परिस्थितीमुळे फन्ने खान बनून राहिल्याचे दुःख अनिल कपूर यांना सलत असते. त्यामुळे मुलीला लता मंगेशकर बनवण्यासाठी अनिल कपूर कोणत्या थराला जातो, हे या चित्रपटाचे कथानक आहे. त्याच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या पिहू या व्यक्तीरेखेचे नावही यामध्ये लता ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाच ऐश्वर्या रायदेखील वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -

कोण होता ‘फन्ने खाँ’

‘फन्ने खान’ हा सुपरहिट डच चित्रपटाचा रिमेक आहे. अनिल कपूर ज्या फन्ने खानची भूमिका साकारत आहे ते काल्पनिक पात्र आहे. मात्र वास्तविक फन्ने खाँ हे १२ व्या शतकातील एक योद्धा होते. चंगेज खाँ यांच्या दरबारात सैनिकाच्या पदावर कार्यरत असणारा फन्ने खाँ भारतावर लढाईसाठी आक्रमण करण्यापूर्वी अफगाणिस्तानच्या बाजूने लढल्या करता आला होता. फन्ने खाँ यांचे काम क्रूर शासन चंगेज खाँची सेवा करणं हे होतं. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला मोठमोठ्या गप्पा मारायची आवड होती.

changes
फन्ने खाँ योद्धा (प्रातिनिधिक चित्र)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -