घरताज्या घडामोडीअनिल कपूरसह दोन कलाकार पॉझिटिव्ह, शुटींग थांबवले

अनिल कपूरसह दोन कलाकार पॉझिटिव्ह, शुटींग थांबवले

Subscribe

जुग जुग जियो या नवीन सिनेमाचे शुटींग चंदीगड येथे सुरू होते.

बॉलिवुड अभिनेता अनिल कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. अनिल कपूर त्याच्या ‘जुग जुग जियो’ या नवीन सिनेमाचे शुटींग करत होते. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच सिनेमाचे शुटींग थांबवण्यात आले आहे. अनिल कपूरसह आणखी दोन कलाकार आणि दिग्दर्शकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

अनिल कपूर सोबत नीतू कपूरचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जुग जुग जियो या नवीन सिनेमाचे शुटींग चंदीगड येथे सुरू होते. वरूण धवन अनिल कपूर, नीतू कपूर यांच्यासह सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सगळे कलाकार पूर्णपणे बरे होईपर्यंत सिनेमाचे शुटींग रद्द करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी आभिनेत्री नीतू कपूरही कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर त्यांची मुलगी रिद्दीमाहीने ही माहिती अफवा असल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

अभिनेता वरूण धवन सारा अली खान सोबत कुली नंबर वन या सिनेमाचे शुटींग करत होता. शुटींग वरून परत येण्याआधी त्याने कोरोना चाचणी केली होती. त्यासंबंधीचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. सिनेमांच्या शुटींगला परवानगी दिल्यानंतर अनेक कलाकारांना कोरोनाशी सामना करावा लागला. कलाकारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने अनेक सिनेमांचे शुटींग अर्ध्यांतच थांबवावे लागले.


हेही वाचा – आदित्यच्या ‘ओमः द बॅटल विदिन’ चित्रपटचा पहिला लूक प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -