घरमनोरंजन'हा' अभिनेता देणार अभिनयाचे धडे!

‘हा’ अभिनेता देणार अभिनयाचे धडे!

Subscribe

नाट्य, चित्रपट क्षेत्रात काम करू पाहणाऱ्यांसठी अभिनेता अंशुमन विचारे याने ‘अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकेडमी’ची सुरुवात केली आहे. या अॅकॅडमीत चित्रपट अभिनय, चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा आणि रंगभूषा आणि सेट डिझाईन यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अनेकांना आपण चित्रपटसृष्टीत, नाटक क्षेत्रात यावं सेलिब्रिटी व्हावं असं वाटत असतं. दररोज मालिका, चित्रपटातून दिसणाऱ्या कलाकारांप्रमाणे आपणही रोज टिव्हीवर दिसावं असं स्वप्न बाळगून अनेक जण मुंबईत येतात. पण इथे आल्यावर नेमकं काय करावं? याबाबत माहिती नसते. अशा मुलांनी आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण कलाक्षेत्रात अभिनेता निवेदक, गायक, निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या अभिनेता अंशुमन विचारे यांनी या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी योग्य मार्गदर्शन व तंत्रशुद्ध शिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकेडमी’ची सुरुवात केली आहे.

या क्षेत्रात पहिले पाऊल टाकत असताना योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन तुमचे करिअर घडवते, हाच महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन या अॅकेडेमीची रचना करण्यात आली आहे. केवळ प्रशिक्षण नाही, तर योग्यतेनुसार १०० % कामाच्या संधीची हमी ही संस्था देणार आहे. चित्रपट अभिनय, चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा आणि रंगभूषा आणि सेट डिझाईन यांचे प्रशिक्षण इथे दिले जाईल. तंत्रशुद्ध प्रशिक्षण, संवाद कौशल्य, तज्ञांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, प्रत्यक्ष अनुभव, ऑडिशनची तयारी या मुलभूत बाबींचे मान्यवरांकडून मार्गदर्शन हे या अॅकेडेमीचे वैशिष्ट्य आहे.

अंशुमन विचारे, अभिनेता

अंशुमन विषयी थोडक्यात

गेली अनेक वर्ष अंशुमन मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. ‘श्वास’, ‘पोस्टर बॉईज’, ‘विठ्ठला शप्पथ’, ‘भरत आला परत’ अशा अनेक चित्रपटांमधून कामं केली आहेत. त्याचप्रमाणे अनेक रिअॅलिटी शोमधून वेगवेगळ्या भूमिका करून अंशुमनने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. अंशुमनचे ‘फू बाई फू’, ’कॉमेडीची बुलेट ट्रेन’ हे कार्यक्रम विशेष गाजले. त्याने नाटक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘पैसा झाला मोठा’, ‘मेरा पिया घर आया’ अशा कॉमेडी नाटकातून त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. ‘मोर्चा’ या सिनेमातून त्याने गाण्याच्या क्षेत्रातही प्रवेश केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -