घरदेश-विदेशमहाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे ‘स्पेशल ऑपरेशन मेडल'

महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे ‘स्पेशल ऑपरेशन मेडल’

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवाद, सीमा ऑपरेशन्स, शस्त्रास्त्र नियंत्रण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि बचाव कार्य यासंदर्भात सुरक्षा दलांनी केलेल्या 4 विशेष मोहिमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, 2022 वर्षासाठीची केंद्रीय गृहमंत्र्यांची ‘स्पेशल ऑपरेशन मेडल’ घोषित करण्यात आली आहेत. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी कॉन्स्टेबल ते अतिरिक्त पोलीस महासंचालकांपर्यंत विविध पदांवर असलेल्या एकूण 63 पोलीस अधिकाऱ्यांना हे मेडल जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

\सन्मानित जवान आणि अधिकारी हे तेलंगणा, पंजाब आणि महाराष्ट्र तसेच जम्मू-काश्मीर आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी आयोजित केलेल्या चार विशेष ऑपरेशन्समध्ये हे सर्वजण सहभागी झाले होते. अंकित त्रिलोकनाथ गोयल (आयपीएस, एसपी), समीर अस्लम शेख, (आयपीएस, एएसपी), संदाप पुंजा मंडलिक (इन्स्पेक्टर), वैभव अशोक रणखांब (एपीआय), सुदर्शन सुरेश काटकर (एपीआय), रतीराम रघुनाथ पोरेती (एपीएसआय), रामसे गवळी उईके (एचसी), ललित घनश्याम राऊत (नाईक), शागिर अहमद शेख (नाईक), प्रशांत अमृत बारसागडे (कॉन्स्टेबल) आणि अमरदीप ताराचंद रामटेके (कॉन्स्टेबल) या महाराष्ट्रातील 11 जणांना केंद्रीय गृहमंत्र्यांची ‘स्पेशल ऑपरेशन मेडल’ घोषित करण्यात आली आहेत.

- Advertisement -

उच्च दर्जाचे नियोजन आवश्यक असणाऱ्या तसेच देश, राज्ये, केंद्रशासित प्रदेशाच्या आणि समाजातील मोठ्या घटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मोहिमांमधील अधिकाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी 2018 सालापासून ही पदके प्रदान केली जातात. दहशतवाद विरोधी मोहिमा, सीमेवरील कारवाई, शस्त्रास्त्र नियंत्रण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि बचाव कार्य अशा क्षेत्रातील विशेष मोहिमांमधील कामगिरीबद्दल ही पदके प्रदान केली जातात.

दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी या पदक विजेत्यांची घोषणा केली जाते. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदान केल्या जाणाऱ्या या पदकांसाठी साधारणपणे एका वर्षात तीन विशेष मोहिमा तर असाधारण परिस्थितीत 5 विशेष मोहिमा विचारात घेतल्या जातात.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आलेल्या या अल्पसंख्यकांना मिळणार भारतीय नागरिकत्व

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -