घरताज्या घडामोडीDrugs Case: कोर्टाने अरमान कोहलीचा अर्ज फेटाळला

Drugs Case: कोर्टाने अरमान कोहलीचा अर्ज फेटाळला

Subscribe

ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज मुंबई कोर्टाने फेटाळला आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला होता. यादरम्यान एनसीबीने अरमानच्या घरातून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर अरमानला ड्रग्ज प्रकरणी अटक केले गेले. माहितीनुसार, अरमानच्या घरातून कोकेन जप्त केले होते. जे कोकेन अरमानच्या घरातून जप्त करण्यात आले होते, ते दक्षिण अमेरिकेमध्ये तयार करण्यात आले होते. त्यामुळे सध्या तपास यंत्रणा मुंबईपर्यंत कोकेन कसे पोहोचले याचा तपास करत आहे.

- Advertisement -

अटकेनंतर अरमान कोहलीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. त्यानंतर अरमानने जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु मुंबई कोर्टाने अरमानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यापूर्वी २०१८मध्ये उत्पादन शुल्क विभागाने स्कॉच व्हिस्कीच्या ४१ बाटल्या ठेवल्या प्रकरणी अरमानला अटक केली होती. कायद्यानुसार दारुच्या १२ बाटल्या घरात ठेवण्याची परवानगी आहे. परंतु अरमानकडे ४१ पेक्षा जास्त बाटल्या होत्या. त्यापैकी बहुतेक विदेशी ब्रँडच्या होत्या.

दरम्यान २०२०मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबी सतत बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडट्रीच्या कलाकारांवर कारवाई करत आहे. अरमान व्यतिरिक्त एनसीबीच्या रडावर अनेक कलाकार आहे. एनसीबीने बॉलिवूडच्या अनेक ए ग्रेड कलाकारांची चौकशी केली आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती या अभिनेत्रींचा समावेश आहे. एनसीबीने एक टेलिव्हिजन कलाकार गौरव दीक्षितला देखील ड्रग्ज रॅकेटमध्ये अटक केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Sidnaazचा झाला होता साखरपुडा, डिसेंबरमध्ये करणार होते लग्न!


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -