घरमनोरंजनAryan Khan : एनसीबीने आर्यनला 'सुपरस्टार' बनवले, राम गोपाल वर्मांची समर्थनार्थ पोस्ट

Aryan Khan : एनसीबीने आर्यनला ‘सुपरस्टार’ बनवले, राम गोपाल वर्मांची समर्थनार्थ पोस्ट

Subscribe

मुंबईतील कॉर्डीला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली आहे. या प्रकरणी आर्यन खानला न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २० ऑक्टोबला आर्यनच्या जामीनावर निर्णय होणार आहे. मात्र बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आता आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत. यात आता अभिनेते राम गोपाल वर्मा यांचेही नाव घेतले जात आहे. एनसीबीने आर्यन खानला ‘सुपरस्टार’ बनलेय असे म्हणत राम गोपाल वर्मा यांनी आर्यनची बाजू घेतली आहे. तसेच शाहरुख खानचा खरा चाहता असल्याने सांगू इच्छितो एनसीबीचा विजय असो. असे राम वर्मा म्हणाले.

- Advertisement -

राम गोपाल वर्मा यांनी मार्मिक शब्दात सांगितले की, आर्यन खानच्या असाधारण लाँचिगचे श्रेय एनसीबीला दिले पाहिजे. आर्यन खानवरील आरोपातून काहीच साध्य होणार नाही तो निश्चितपणे यातून बाहेर पडेल. जर शाहरुखच्या मुलालाही सोडत नसतील तर विचार करा की, तर तुमच्या आमच्यांसारख्यांचे काय करू शकतात.

- Advertisement -

त्यांनी पुढे सांगितले की, मी अशी खात्री देऊ शकतो की येणाऱ्या काळात आर्यन खान आयुष्याबद्दल सांगताना वडील शाहरुख खानपेक्षा त्याने तुरुंगात आणि एनसीबीकडून अधिक शिकलो असे सांगेल. आर्यनचा तुरुंगातील अनुभव त्याच्यासाठी फायदेशीर ठरेल. हे अनुभव त्याला खूप शार्प बनवत आहेत.

राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले की, शाहरुखच्या खऱ्या चाहत्यांनी एनसीबीचे आभार मानायला हवेत. आता आर्यन खान सुपरस्टार बनणार आहे. शाहरुख खानेने वडील असल्याच्या नात्याने मुलाला फक्त स्टार बनवले. मात्र एनसीबीने त्याच्या जीवनाचा तो पैलू दाखवून त्याला एक संवेदनशील अभिनेता बनवला आहे. NCB त्याला ग्राउंड रिअॅलिटी दाखवत आहे. ज्यामुळे त्याची कामगिरी आणि व्यक्तिमत्व अधिक सुधारेल.

राम गोपाल वर्मा यांनी अगदी असेही म्हटले की, आर्यन खान भविष्यात सांगेल की त्याने तुरुंगात असताना अनेक गोष्टी शिकल्या. एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यापासून फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी शाहरुख खानच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. याआधी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की, आर्यन खान हा शाहरुखचा मुलगा असल्याने त्याला लक्ष्य केले जात आहे. आर्यन खानला टार्गेट करण्याचे कारण फक्त शाहरुख खान असल्याचे त्यांनी म्हटले होते. यात फक्त आर्यन बद्दल बोलले जात आहे मात्र यात मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट सारखे इतर लोकही आहेत. काही लोक शाहरुख खानसोबतचे हिसाब चुकते करत आहेत. त्यामुळे आर्यन खान प्रकरणात  लोकांना शाहरुखसोबतचे हिशोब चुकते करण्याची आयती संधी चालून आली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -