राकेश-शमिताच्या ब्रेकअपवर रिद्धी डोंगराला जबाबदार ठरवताच; रिद्धीने दिलं सणसणीत उत्तर

या दोघांच्या ब्रेकअपबाबत चाहते राकेशच्या आधीच्या पत्नीला जबाबदार ठरवत आहेत. वारंवार सोशल मीडियावर राकेशची आधीची पत्नी रिद्धी डोंगराला शाराच्या चाहत्यांकडून ट्रोल केलं जात आहे.

बिग बॉस ओटीटी फेम शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. मात्र मागील काही दिवसांपूर्वी राकेश आणि शमिता त्यांच्या नात्यावर कायमचा पूर्णविराम दिला. दोघेही एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. दरम्यान, त्यांचे चाहते त्यांच्या ब्रेकअपमुळे खूप नाराज झाले आहेत. या दोघांच्या ब्रेकअपबाबत चाहते राकेशच्या आधीच्या पत्नीला जबाबदार ठरवत आहेत. वारंवार सोशल मीडियावर राकेशची आधीची पत्नी रिद्धी डोंगराला शाराच्या चाहत्यांकडून ट्रोल केलं जात आहे. दरम्यान आता या सगळ्याला वंतागून रिद्धीने ट्रोलर्सला सणसणीत उत्तर देत गप्प केलं आहे.

रिद्धीने ट्वीट करत तिने ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं की, ठीक आहे मित्रांनो. मी पाहतेय की राकेशमुळे विनाकारण लोक माझ्याबद्दल काहीही बोलत आहेत. राकेश माझा लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील चांगला मित्र आहे आणि मी माझ्या सगळ्या मित्रांसोबत आहे आणि ते जो निर्णय घेतात, त्यामध्ये मी त्यांचं भलं होण्याची इच्छा दर्शवते.

रिद्धा पुढे म्हणाली की, मला वाटतं की तुम्ही सगळे राकेश आणि शमिता वेगळे झाल्यामुळे खूप दुःखी आहात. परंतु तुम्ही मला यामध्ये विनाकारण ओढत आहात. यामध्ये माझा काहीही संबंध नाही. कृपया तुम्ही हे थांबवा.

लग्नाच्या 7 वर्षानंतर राकेश आणि रिद्धी वेगळे
रिद्धी डोंगराने 2011 मध्ये राकेश सोबत लग्न केलं होतं. 2019 मध्ये दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर राकेशला बिग बॉस ओटीटीमध्ये शमिता शेट्टीशी प्रेम झालं. त्यानंतर अनेक दिवस दोघं एकमेकांना डेट करत होते. परंतु मागच्या महिन्यात दोघांचा ब्रेकअप झाला.


हेही वाचा :आमीर खानला महाभारतावर आधारित चित्रपट तयार करण्याची इच्छा; परंतु म्हणाला मी त्याला घाबरतो