Lata Mangeshkar Health Update: लतादीदींच्या प्रकृतीसाठी मंगेशकर कुटुंबियांचे देवाला साकडे  

काही दिवसांपूर्वी कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यामुळे लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Asha Bhosle reveals Pujas are taking place at Lata Mangeshkar's residence for speedy recovery
Lata Mangeshkar Health Update: लतादीदींची प्रकृती सुधारणेसाठी कुटुंबिय करतायत असे प्रयत्न; आशा भोसलेंनी दिली माहिती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangheshkar) या महिन्याच्या सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लतादीदींचे वय अधिक असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या लतादीदींवर उपचार सुरू असून त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर्स सतत त्यांच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट देत आहेत (Lata Mangeshkar Health). लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया झाला आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारण होत आहे. अशा परिस्थितीत चाहते त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लता मंगेशकर यांच्या आरोग्यावर आहे.

लता मंगेशकर यांची छोटी बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी लतादींदीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी कुटुंबिय काय प्रयत्न करत आहेत, याबाबत सांगितले आहे. लतादीदींच्या प्रकृतीसाठी मुंबईतील त्यांच्या घरी विशेष पूजेचे आयोजन केले आहे. ई-टाईम्ससोबत बातचित करताना लता मंगेशकरांसाठी आयोजित केलेल्या पूजेबाबत आशा भोसलेंनी सांगितले. आशा भोसले म्हणाल्या की, ‘लतादीदींची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी त्यांच्या घरी शिव शंकरांच्या रुद्र रुपाची स्थापना केली असून पूजा पाठ-पठन सुरू आहे.’

दरम्यान रविवारी सकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मी ब्रीच कँडी रुग्णालयातील अधिकाऱ्यांसोबत बातचित केली, त्यांनी मला लतादीदींच्या आरोग्याबाबत अपडेट दिली. मी त्यांना सांगितले की, रुग्णालयाच्या प्रवक्त्याने लतादीदींच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले पाहिजे, कारण लोकं त्यांच्या आरोग्याबाबत जाणून घेऊ इच्छित आहेत.’

नोव्हेंबर २०१९पासून लता मंगेशकर घराच्या बाहेर पडल्या नाहीत

माहितीनुसार, लता मंगेशकर नोव्हेंबर २०१९पासून घरातून बाहेर पडल्या नाहीत. परंतु त्यांच्या घरातील एका नोकरचा कोरोना अहवाला पॉझिटिव्ह आला. त्यामुळे लता मंगेशकर यांची चाचणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी लता मंगेशकर यांना नोव्हेंबर २०१९मध्येच श्वास घेण्याचा त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा – Birju Maharaj: प्रसिद्ध कथ्थक नर्तनकार पंडीत बिरजू महाराजांचे निधन,वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास