घरताज्या घडामोडीरेणूका आणि आशुतोष...अशी सुरु झाली होती 'प्रेमकहाणी'

रेणूका आणि आशुतोष…अशी सुरु झाली होती ‘प्रेमकहाणी’

Subscribe

आशुतोष राणा यांनी रेणुका शहाणे यांची पहिली भेट.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये दर आठवड्याला सेलिब्रेटी येतात आणि आपल्या आयुष्यातील काही खास गोष्टी त्यांच्या चाहत्यांना सांगतात. दरम्यान, शोच्या आधीच काही खास सेलिब्रेटींचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतात. नुकताच आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी आपली प्रेमकहाणी सांगितल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमात गप्पा सुरु असतानाच आशुतोष राणा यांनी रेणुका शहाणे यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल काही अज्ञात गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. आशुतोष म्हणाले, ‘हंसल मेहता यांच्या ‘जयते’ चित्रपटाचा सुमित थिएटरमध्ये प्रीव्यू होता. याकरता मी, राजेश्वरी सचदेव आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांना सोबत घेऊन त्याठिकाणी गेलो. मी तिथे गेलो तेव्हा मला कळले की राजेश्वरी आणि रेणुका या दोघांची खूप चांगली मैत्री आहे. तर मी रेणुका शहाणेचा मी तर चाहता होतो. विशेष म्हणजे त्याच दरम्यान, ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपटही आला होता. त्यामुळे मी त्यांच्या कामावर खूप खुश होतो. जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा आम्ही जवळपास अर्धा तास आपापसात बोलत राहिलो आणि त्यावेळी मला कळले की, आमच्या दोघांचेही विचार जुळत आहेत.

त्यानंतर आम्ही बाहेर पडलो तेव्हा रात्रीची वेळ झाली होती. त्यात रविवार होता. मी सहज विचारले तुम्ही कुठे राहता? त्यावर रेणुका म्हणाल्या मी दादरला राहते. त्यावर मी प्रश्न केला एवढ्या रात्री कशा जाणार? त्यावर त्या म्हणाल्या आज रविवार असल्याने मी स्टाफला सुट्टी दिली आहे. त्यानंतर त्यांनी मला प्रश्न केला तुम्ही कुठे राहता? त्यावर मी म्हणालो मी चेंबूरला राहतो. मग, मी विचारले तुम्हाला मी सोडू का? त्यावर त्या म्हणाल्या माझा मुंबईत जन्म झाला आहे. आतापर्यंत मी पाहिले नाही की, जुहूवरुन चेंबूरला जाताना मध्ये कुठे दादर लागते. त्यावर सगळे हसले. पण, वाईट नको वाटून घेऊ मी जाते’, असं देखील त्या पुढे म्हणाल्या.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, ‘दिग्दर्शक रवी राय यांना आशुतोष आणि रेणुकासोबत एक शो करायचा होता. त्याकरता त्यांनी आशुतोष यांना फोन केला होता आणि आशुतोष यांनी देखील या संधीचा फायदा घेतला आणि राय यांच्याकडून रेणुकाचा नंबर मागितला. त्यावेळी त्यांना कळले की, रेणुका या रात्री १० नंतर कोणाचेही फोन उचलत नाहीत. तसेच अनोळखी नंबर असेल तर तेही उचलत नाही. दरम्यान, आशुतोषने आंसरिंग मशीनवर रेणुका यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी त्यामध्ये आपला नंबर देखील दिला नाही. कारण त्यांना जाणून घ्यायचे होते, की त्या स्वत:हून फोन करुन त्या व्यक्तीचा शोध घेतील. नशीब इतक चांगले की आशुतोष यांना त्यांची बहिणीने सांगितले की, रेणुका शहाणेंचा फोन आला होता. त्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद सांगितले आहेत. त्यानंतर रेणुका शहाणेंनी त्यांचा नंबर दिला आणि त्यांचे बोलणे सुरु झाले.


हेही वाचा – Sushant Suicide case: NCB ने केली ड्रग्ज डिलरला अटक,बॉलिवूड,राजकारणातील अनेक नावं समोर!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -