घरमनोरंजनआशुतोष पत्की लवकरच रुपेरी पडद्यावर

आशुतोष पत्की लवकरच रुपेरी पडद्यावर

Subscribe

आशुतोष पत्की यांचा ‘Once मोअर’ हा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांचे चिरंजीव आशुतोष पत्की लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘Once मोअर’ हा आशुतोषचा पहिला वहिला चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळताना नरेश बिडकर यांनी एका नावीन्यपूर्ण विषयावर हा चित्रपट बनवला आहे. ‘Once मोअर’ या सिनेमात आशुतोष पत्की हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती सुहास जहागीरदार यांनी केली असून आशुतोषसोबत धनश्री दळवी ही नवी अभिनेत्री दिसणार आहे. या चित्रपटात आशुतोषच्या जोडीला रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार आदी मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकार पाहायला मिळणार आहेत. श्वेता बिडकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून छायांकन संजय सिंग यांचे आहे. आशुतोषने अनुपम खेर यांच्या अकादमीमध्ये अभिनयाचे प्रिशिक्षण घेतले आहे. तसेच याआधी त्याने मराठी मालिकामध्ये काम केले आहे. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या चांगल्याच गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले असून तो याद्वारे घराघरात पोहोचला आहे.

- Advertisement -
ashutosh-patki
आशुतोष पत्कीचे चित्रपटात पदार्पण

गाणं आणि संगीत बालपणापासूनच ऐकत आलो आहे, पण अभिनय हे माझं पॅशन आहे. बाबांनीही कधीच कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स केला नाही की अडवलं नाही. त्यामुळे हॅाटेल मॅनेजमेंटनंतर अभिनयाचं ट्रेनिंग घेऊन मालिकांमध्ये काम केलं. हा सिनेमाही मला त्यांच्यामुळेच मिळाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.  आशुतोष पत्की, अभिनेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -