घरमनोरंजनइटलीच्या 'लेक कोमो'मध्ये रणवीर दीपिकाचं होणार शुभमंगल?

इटलीच्या ‘लेक कोमो’मध्ये रणवीर दीपिकाचं होणार शुभमंगल?

Subscribe

लेक कोमो हा इटलीमधील सर्वात मोठा तलाव असून १३०० फूट खोल आणि १४६ स्क्वेअर किलोमीटर लांब आहे. याच तलावाकाठी दीपिका आणि रणवीर लग्न करणार असल्याची माहिती आहे.

फिल्मफेअर मॅगझिनच्या वृत्तानुसार रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचं शुभमंगल याचवर्षी १० नोव्हेंबरला इटलीमध्ये होणार आहे. लग्नासाठी या कपलनं इटलीचं लेक कोमो, लोम्बार्डी नावाचं ठिकाण निवडलं आहे. बीच हॉलिडेसाठी हे बेस्ट डेस्टिनेशन असल्याचं म्हटलं जातं. लेक कोमो हा इटलीमधील सर्वात मोठा तलाव असून १३०० फूट खोल आणि १४६ स्क्वेअर किलोमीटर लांब आहे. दीपिका आणि रणवीर गेले पाच वर्ष एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. मात्र दोघांपैकी कोणीही या वृत्ताला कधीही दुजोरा दिला नाही. मात्र सोशल मीडियावर दोघंही अॅक्टिव्ह असून दोघांच्या प्रेमाची प्रचिती चाहत्यांना नेहमीच येत असते. रणवीर आणि दीपिका एकमेकांच्या फोटोंवर नेहमीच प्रेमाच्या कमेंट्स देत असतात. दरम्यान काही दिवसांपूर्वीच दीपिकानं रणवीरच्या फोटोवर ‘माईन’ अशी कमेंटही केली होती.

lake como
इटलीतला लेक कोमो तलाव

दाक्षिणात्य पद्धतीनं लग्न होणार

फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, रणवीर आणि दीपिका दक्षिण भारतीय पद्धतीनं लग्न करणार आहे. दोघांच्याही घरून या लग्नाला संमती असून यापूर्वी १९ नोव्हेंबर तारीख ठरवण्यात आली होती. मात्र सर्वांच्या संमतीवरून १० नोव्हेंबर ही तारीख अंतिम करण्यात आली आहे. दरम्यान लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असून रणवीरला आपल्या ‘सिम्बा’ चित्रपटाचं चित्रीकरण लवकर संपवायचं आहे आणि दीपिकानं एकही चित्रपट स्वीकारलेला नाही. दोघांनाही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान कामात व्यग्र राहायचं नसल्याची बातमी आहे.

- Advertisement -

दीपिका रणवीर आहेत अनुष्का विराटच्या मार्गावर

मागच्या वर्षी डिसेंबरमध्येच अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनं इटलीमध्येच डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. तर आता दीपिका आणि रणवीरही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत इटलीमध्ये लग्न करणार आहेत. इतकंच नाही, तर दीपिका आणि रणवीरदेखील ‘मान्यवर’ची जाहीरात करणार असल्याची सध्या चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -