Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने जगभरातून कमावले 'इतके' कोटी

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने जगभरातून कमावले ‘इतके’ कोटी

Subscribe

हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’येत्या 16 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमरुनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. दरम्यान, शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करायला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 179.83 कोटींची कमाई केली आहे.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने जगभरातून कमावले इतके कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Avatar (@avatar)

- Advertisement -

जेम्स कॅमरुनच्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 41 कोटी तर दुसऱ्या दिवशी 42 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 46 कोटी कमावले असून चौथ्या दिवशी 14-16 कोटी आणि पाचव्या दिवशी 18 कोटी कमावले आहेत. आत्तापर्यंत एकूण 179.83 कोटींची कमाई केली आहे. तसेच संपूर्ण जगभरातून या चित्रपटाने 3956.17 कोटी कमावले आहेत.

भारतातील 5 भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित
हा चित्रपट भारतामध्ये हिंदी, इंग्लिश, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत.

- Advertisement -

2009 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘अवतार’

Avatar: The Way of Water Box Office Estimate Day 1: James Cameron's venture  flirting with Rs. 40 crore opening day :Bollywood Box Office - Bollywood  Hungama

दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’ हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास 13 वर्षांनी ‘अवतार’ चा दुसरा सिक्वेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 2009 साली या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला चांगली भुरळ पाडली होती. एका सामान्य कथेच्या आधारावर फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेऊन ‘अवतार’ चित्रपटाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल बनवण्याची घोषणा याआधीच केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.


हेही वाचा :

शाहरुख कधी भेटला तर त्याला जिवंत जाळेन, संत परमहंसांची धमकी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -