घरमनोरंजनआयुष्यमानची पत्नी बाल्ड लुकमध्ये उतरली रॅम्पवर

आयुष्यमानची पत्नी बाल्ड लुकमध्ये उतरली रॅम्पवर

Subscribe

अभिनेता आयुष्यमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने बाल्ड लुकमध्ये रॅम्प वॉक केला आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त कँसरशी झुंज देणाऱ्या या महिलेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अभिनेता आयुष्यमान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप ही सध्या कँसरशी झुंज देत आहे. तरीही सध्या मुंबईमध्ये सुरु असलेल्या लॅक्मे फॅशन वीक २०१९ मध्ये तिने रॅम्प वॉक केला आहे. ताहिराचा बाल्ड लुक, डोळ्यावर कुल गॉग्लस आणि सफेद रंगाचा ड्रेस अशा लुकमध्ये ताहिरा रॅम्पवर उतरली होती. ताहिराला तिच्या ट्रिटमेंट करत केसांचा त्याग करावा लागला होता. दरम्यान, नकली केस लावून मी थकलेय. पण आज चक्क मुंडन केले. आता मुंडन केल्यावर मस्त वाटतयं, असे लिहित ताहिराने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

Obsessing ??‍? @lakmefashionwk @bodicebodice #fashionablybald

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap) on

- Advertisement -

रॅम्पवॉक करण्यापूर्वी मला सांगितले गेले होते की, रॅम्पवर चालताना जास्त हसायचे नाही, पण मी स्वतःवर संयम ठेऊ शकले नाही. रॅम्प वॉक करण्याचा माझा हा पहिला अनुभव होता, असे नमूद करत तिने तिच्या रॅम्पवॉकचे फोटो शेअर केले आहेत.

कँसरशी लढा देते ताहिरा

ताहिराला ब्रेस्ट कँसर असून दुसऱ्यांदा या आजाराचे निदान झाले आहे. ताहिराला १२ किमोथेरपी घ्याव्या लागणार आहेत. यापैकी सहा झाल्या असून आणखी सहा बाकी आहेत. तिने स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. ताहिरा एक प्राध्यापक असून तिने २०११ साली आयुष्यामानसोबत लग्नगाठ बांधली. त्याआधी दोघेजण एकमेकांना ११ वर्ष डेट करत होते. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. ताहिराच्या कठिण काळात आयुष्यमान तिचा भक्कम आधार बनला आहे.

- Advertisement -

वाचा – अभिनेत्री सोनाली बेंद्रे सेटवर परतली

सोनाली पुन्हा कामावर परतली

अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही हाय ग्रेड कँसरच्या आजाराने त्रस्त होती. ती उपचारासाठी अमेरिकेला गेली. त्यानंतर पुढील उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाली. अखेर उपचार घेतल्यानंतर आता ती भारतात परतली आहे. नुकतचं सोनाली कामावर परतली आहे. सोनालीने ही आनंदाची बातमी इंस्टाग्राम अकांउटवरून शेअर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -