Balika Vadhu 2: मोठ्या आनंदीच्या भूमिकेत दिसू शकते ‘ही’ अभिनेत्री

मोठ्या आनंदीची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष

Balika Vadhu 2: yeh rishta kya kehlata hai Actress Shivangi Joshi can be seen in role of Anandi
Balika Vadhu 2: मोठ्या आनंदीच्या भूमिकेत दिसू शकते 'ही' अभिनेत्री

हिंदी टेलिव्हिजवरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘बालिका वधूचा’ दुसरा सीजन देखील ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मालिकेतील आनंदी आता मोठी होत आहे आणि आता मोठ्या आनंदीची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ई टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री ‘शिवांगी जोशी’ मोठ्या आनंदीची भूमिका साकारणार आहे. मालिकेत सध्या छोट्या आनंदीची मुख्य भूमिका श्रेया पटेल निभावत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या आनंदीच्या भूमिकेसाठी मालिकेच्या निर्मात्यांनी खूप मेहनत घेतली. अनेक नावांमधून शिवांगीचे नाव आनंदीच्या मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आले. बालिका वधू मालिकेच्या दुसऱ्या पार्टमध्ये कास्टिंगमध्ये निर्मात्यांनी कोणताही कसर सोडलेली नाही. शिवांगी देखील मोठ्या आनंदीसाठी परफेक्ट दिसेल यात काही शंका नाही. मालिकेचा काळ थोडा पुढे सरकणार असून प्रेक्षकही मालिकेचे नवे रुप पाहण्यासाठी आतूर आहेत. नोव्हेंबर महिन्यांच्या शेवटी नवी आनंदी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बालिका वधू २ मध्ये मोठ्या आनंदीची भूमिका अभिनेत्री शिवांगी निभावणार असल्याचे तिने कुठेही अधिकृतरित्या सांगितलेले नाही. या आधी शिवांगी ‘परवरिश- कुछ खट्टी मिठ्ठी’, ‘खेलती है जिंदगी आँखे मिचोली’ सारख्या मालिकांमधून दिसली आहे. २०१६मध्ये आलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून शिवांगी घराघरात पोहचली.


हेही वाचा – Amruta Fadnavis: अखेर अमृता फडणवीसांनी जाहीर केलेले तुफानी गाणं प्रदर्शित