घरमनोरंजनइंडियन आयडलच्या ग्रँन्ड फिनाले आधीच शनमुख प्रियाचा पत्ता कट

इंडियन आयडलच्या ग्रँन्ड फिनाले आधीच शनमुख प्रियाचा पत्ता कट

Subscribe

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो ‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. सध्या शो शेवटच्या टप्प्यात आला असून लवकरच इंडियन आयडल 12 चा विजेता कोण ठरणार? या कडे सर्व स्पर्धकांचे तसेच प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. दिवसेंदिवस स्पर्धा खूप कठिण वळण घेत असून प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतांना दिसत आहे.आता टॉप सहा स्पर्धकांची निवड देखील करण्यात आली आहे. यामध्ये पवनदीप राजन ,अरुणिता कांजीलाल,मोहम्मद मोहम्मद दानिश, निहार ताउरो, सायली कांबळे, शनमुख प्रिया यांचा समावेश आहे. पण यापैकी एका स्पर्धकाचा प्रवास ग्रँन्ड फिनालेच्या एक दिवसापुर्वीच संपणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर यंदा सेमी फिनालेमध्ये कोणता स्पर्धक आऊट होणार आहे याची तुफान चर्चा रंगत आहे. सेमी फिनालेमध्ये दिग्दर्शक करण जौहरने स्पेशल गेस्ट म्हणून हजेरी लावली आहे. स्पर्धकांने करणने दिग्दर्शित तसेच प्रोड्यूस केलेल्या सिनेमातील गाणी गायली. माहितीनूसार ग्रँन्ड फिनाले पुर्वी सायली कांबळे तसेच शनमुख प्रिया यापैकी कोणी एक आऊट होणार असल्याचे कळतेय.

- Advertisement -

सध्या स्पर्धेतून कोण बाद होणार याबाबत अधीकृत माहिती समोर आली नाहीये तसेच शनमुख प्रिया आणि सायली कांबळे पैकी कोणी एक ग्रँन्ड फिनाले आधीच बाद होऊ शकतात असे संकेत देण्यात आले आहेत. सर्व स्पर्धक ग्रँन्ड फिनालेची जोरदार तयारी करत असून सेमी फिनाले मध्ये स्पर्धकांनी प्रसिद्ध डिजायनर मनीष मल्होत्रा यांचे आउटफिट परिधान करणार असून स्पर्धकांचा लूक रिवील करण्यात आला आहे. तसेच स्पर्धकांना शो संपण्यापुर्वीच गाण्याची संधी मिळाली असल्याचे समजतेय करण जौहरने शो मधील दोन स्पर्धकांना त्याच्या आगामी सिनेमात गाण गाण्याची ऑफर दिली आहे.करणने अरुणिता कांजीलाल आणि मोहम्मद दानिश यांचे धर्मा फॅमिलीत स्वागत केलं आहे. तसेच यापुर्वी सवाई भट्ट आणि पवनदीप राजन-अरुणिता सोबत हिमेश रेशमियाने एक गाण चित्रीत केल आह. आता इंडियन आयडलची ट्रॉफी कोण पटकावतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे हि वाचा – काजोलचा बर्थडे व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले तू या सर्वांच्या लायक नाहीये

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -