‘भाभी किसको बोला?’, साराचा कार्तिकच्या चाहत्यांना सवाल

आपल्या चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असणारा अभिनेता, कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्यांसाठी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.

Bhabhi kisko bola? Sara Ali Khan has say to Kartik Aaryan’s fan
'भाई किसको बोला?', साराचा कार्तिकच्या चाहत्यांना सवाल

आपल्या चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असणारा अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्यांसाठी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘लव्ह आज कल’ या त्याच्या सिनेमात सारा अली खान ला ‘भाभी’ म्हणून संबोधले आहे. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्याआधीच सारा आणि कार्तिकच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आपण कोणासोबतही रिलेशनमध्ये नसल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

नेमके काय म्हणाली सारा?

कार्तिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार्तिक आणि काही मुले एकत्रित फुटबॉल खेळताना दिसत आहेत. अचानक त्यापैकी एकजण “कार्तिक भैय्या, देखो भाभी आ गयी”, असे म्हणताना दिसतो आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सारा हसत हसत आणि सहज रागविल्याचे दाखवत म्हणाली की, ‘भाभी किसको बोला’, अशा मजेशीर पद्धतीने त्यांना खडसावत ‘हे तुच बोलायला सांगितलेस ना?’ असा गंमतीशीर प्रश्न तिने कार्तिकला यावेळेस विचारला आहे.

View this post on Instagram

Bhabhi kisko bola ☺️

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

 

सारा कार्तिकला डेट करते?

सिनेमाच्या लॉंचिंगसाठी झालेल्या एका मुलाखतीत तिला ‘कार्तिकला डेट करत आहेस का?’ असे विचारले असता सुरूवातीला हा प्रश्न तिने टाळण्याच प्रयत्न केला. मात्र नंतर ‘मी कार्तिकला सिनेमात डेट करत आहे आणि इतकेच महत्वाचे आहे, कृपया सर्वांनी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी दोन तास हा सिनेमा आपल्या व्हॅलेंटाईन सोबत घालवावा’, असे तिने यावेळीस सांगितले.

एका पुरुषात ती कोणत्या गुणांकडे पाहत आहे? याविषयी विचारले असता सारा म्हणाली, “मला जे वाटते ते फार महत्वाचे आहे, विशेषत: आजच्या काळात एकमेकांना समजून घेणे आणि परस्पर आदर असणे महत्वाचे आहे. पुरूष किंवा जो आपला जोडीदार असेल तो समजून घेणारा, एकमेकांविषयी प्रेम आणि सन्मान असणारा हवा. पुरूषातील अशा गुणांना मी समर्थन देते. मी बर्‍यापैकी स्वतंत्र आहे, म्हणून मला खरोखर समर्थनाची आवश्यकता नाही”, असे साराने मुलाखती दरम्यान सांगितले.

‘प्रेम आज काल’ हा सिनेमा १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात आरुषि शर्मा आणि रणदीप हूडा हे देखील मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.