घरमनोरंजनBharti Singh ने शेअर केली मुलाची पहिली झलक

Bharti Singh ने शेअर केली मुलाची पहिली झलक

Subscribe

भारती या फोटोमध्ये तिच्या लहानग्या मुलाला कुशीत घेताना दिसत आहे. आपल्या बाळाला कुशीत घेतल्यावर आईला जो आनंद मिळतो, तोच आनंद या फोटोतील भारतीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

ज्याची अनेक दिवसांपासून अनेकांना उत्सुकता होती, शेवटी तो क्षण आलाच. कॉमेडी क्वीन भारती सिंहने आता तिच्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोमध्ये जरी भारतीने तिच्या मुलाचा चेहरा दाखवला नसला तरी तिच्या मुलाची पाठमोरी झलक पाहून चाहते खुश झाले आहेत.

भारतीने दाखवले मुलाची झलक

- Advertisement -

भारती या फोटोमध्ये तिच्या लहानग्या मुलाला कुशीत घेताना दिसत आहे. आपल्या बाळाला कुशीत घेतल्यावर आईला जो आनंद मिळतो, तोच आनंद या फोटोतील भारतीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. या फोटोतील भारतीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असं वाटतंय की, भारती कुठे तरी हरवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

- Advertisement -

भारती फोटोमध्ये गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसून येत आहे. आणि तिचा मुलगा पांढऱ्या कपड्यात दिसत आहे. मात्र भारतीने तिच्या मुलाचा चेहरा या फोटोमध्ये दाखवलेला नाही. पण तिचे चाहते तिच्या मुलाचा चेहरा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

चाहते आणि कलाकार देत आहेत प्रेम

मुलाबरोबर आपला पहिला फोटो शेअर करत भारतीने खाली कॅप्शनमध्ये life line असं लिहिलं आहे. भारतीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसह इतर सेलिब्रिटी कलाकार सुद्धा खूप प्रेम देत आहेत. या पोस्टवर गौहर खान कमेंट करून म्हणाली, तुमच्यासाठी खूप खूश आहे, ईश्वर तुमच्या कुटुंबाला खूप प्रेम देवो. तसेच निशा रावल कमेंट करून म्हणाली, Awwww! प्रिय भारती, तुला आणि तुझ्या बाळाला खूप सारे प्रेम.

डिलिव्हरीच्या काही दिवसांनंतरंच कामावर परतली होती भारती

भारती सिंह तिच्या प्रेग्नेंसी काळात खूप अॅक्टिव राहिली होती. तिने डिलीवरी व्हायच्या एक दिवस आधीपर्यंत खूप काम करत होती. आपल्या मुलाच्या जन्मानंतर सुद्धा भारती लगेच काही दिवसात कामावर परत आली. अनेक लोकांनी तिला ट्रोल केलं. तर काहीजणांनी तिचं कौतुक सुद्धा केलं. आता भारतीची ही हिंमत आणि जिद्द आता अनेकजण उदाहरण म्हणून पाहतील.


हेही वाचाः  पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं; अभिनेता प्रतीक गांधीने शेअर केला मुंबई पोलिसांचा वाईट अनुभव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -